Dainik Maval News : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे त्रिपुरारी पौर्णमेनिमित्त लोहगड शिवस्मारकावर भव्य दिव्य असा दीपोत्सव व स्वर्गीय रतनजी टाटा यांना दीप वंदना करून अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम भारतीय उद्योग जगतामध्ये अग्रणी असणाऱ्या टाटा उद्योग समूहाचे प्रमुख पद्मविभूषण स्वर्गीय रतनजी टाटा यांना दीप वंदनेने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच शिवप्रेमी स्वर्गीय शेखर इनामदार यांना ही दीपवंदनेने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शिवस्मारकावर हजारो दिव्यांनी परिसर उजळून निघाला होता. सुंदर फुलांनी शिवस्मारक सजावट करण्यात आली होती. शिवरायांच्या जयघोषाने नवचैतन्य निर्माण झाले होते.
मंच आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. लोहगडाच्या पायथ्याला भव्य शिवस्मारक उभे राहिले. मंचाच्या पाठपुराव्यामुळे लोहगडाचे तटबंदी, बुरुज, पायऱ्या, दिशादर्शक फलक इत्यादी दुर्गसंवर्धनाची कामे भारतीय पुरातत्व विभागामार्फत पूर्ण करण्यात आली. मंच, लोहगड ,घेरेवाडी ग्रामस्थ व भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संघटित प्रयत्नांमुळे लोहगडचा विकास झाला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत लोहगडला नामांकन मिळाले असल्यामुळे सर्व शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दीपोत्सव कार्यक्रमामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये शिवकार्याची भावना निर्माण होईल अशी आशा मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी व्यक्त केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पोलिसांचा आगळा वेगळा ‘मावळ पॅटर्न’ : भयमुक्त निवडणुकीसाठी तालुक्यातून 101 गुन्हेगार हद्दपार
– शांत – सुरक्षित आणि समृद्ध मावळसाठी उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा ‘वचननामा’ प्रसिद्ध । Bapu Bhegade
– होम ग्राउंडवर सुनिल शेळके यांचे भव्यदिव्य स्वागत ! हजारोंच्या संख्येने तळेगावकर रस्त्यावर । MLA Sunil Shelke in Talegaon