Dainik Maval News : वडगाव मावळ येथील रहिवासी असलेल्या आदर्श शिक्षिका दीपाली गुजराथी यांचे सोमवारी (दि. 19 ऑगस्ट) आकस्मिक निधन झाले. सोमवारी रक्षाबंधनाचा सण होता. परंतु पहाटेच्या सुमार भगिनी दीपाली गुजराती यांचे आकस्मिक निधन झाल्याची माहिती त्यांचे बंधू वसंतकुमार गुजर यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
श्रावणी सोमवारचा तिसरा दिवस.. रक्षाबंधणाचा सण.. आज भावांना राखी बांधण्यासाठी स्व. दीपाली या पिंपरी-चिंचवड येथे जाणार होत्या. परंतु पहाटेच त्यांची प्राणज्योत मालवली. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबावर आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मागे त्यांचे पती देविदास गुजराथी (मा मुख्याध्यापक) आणि 4 मुली, 4 जावई, 6 नातवंड आणि 3 भाऊ, 2 बहिणी असा मोठा परिवार आहे. चिंचवड हे त्यांचे माहेर गाव होते. ( Deepali Gujarathi Passed Away Vadgaon Maval Sister Death on Rakshabandhan )
वडगाव शहरातील माळीनगर येथील रहिवासी कैलासवासी दीपाली देविदास गुजराथी यांनी वयाच्या 71व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आदर्श शिक्षिका असा त्यांचा नावलौकीक होता. जिल्हा परिषद ब्राम्हणवाडी (ता. मावळ, जि.पुणे) येथील त्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी तालुक्यात अत्यंत चांगले विद्यार्थी घडविले होते. सोमवार, दि. 19 ऑगस्ट रोजी दीपाली यांचे निधन झाले असून दिनांक 28 ऑगस्ट रोजी त्यांचा दहावा आणि 31 ऑगस्ट रोजी तेरावा विधी राहत्या घरी होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
अधिक वाचा –
– देवले गावातील शेतकऱ्याचा पोरगा बनला पोलीस अधिकारी ; एकाच आठवड्यात दोन ठिकाणी निवड । Maval News
– साते गावातील सद्गुरू आगळमे याची पिंपरी-चिंचवड पोलीस दलात निवड, गावकऱ्यांनी खांद्यावर घेऊन काढली मिरवणूक । Maval News
– स्तुत्य उपक्रम ! ऑफबीट फाउंडेशन तर्फे भाजे येथील संपर्क बालग्राम मधील मुलींसाठी आवश्यक साधनसामग्रीची भेट