व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 8, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! मावळ तालुक्यातील पाणी योजनांच्या कामांची चौकशी होणार; मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश

आमदार सुनिल शेळके यांनी बुधवार, दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन लेखी पत्राद्वारे पाणी योजनांची सद्यस्थितीची माहिती दिली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 20, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
sunil-shelke-gulabrao-patil

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


मावळ तालुक्यात जल जीवन मिशन योजनेंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांचे झालेले निकृष्ट दर्जाचे काम आणि त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आमदार सुनिल शेळके यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शुक्रवार, दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी लक्षवेधी उपस्थित केली होती. योजनांच्या निकृष्ट कामाचे फोटो दाखवून सद्यस्थिती मांडली होती. त्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी योजना निहाय माहिती दिल्यास त्याची चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

tata cars weekends ads

त्यानुसार, आमदार सुनिल शेळके यांनी बुधवार, दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन लेखी पत्राद्वारे पाणी योजनांची सद्यस्थितीची माहिती दिली. त्यामुळे मावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यामधील दोषींवर कडक कारवाईचे संकेत मिळत आहेत. ( defective jal jeevan mission water schemes will be investigated in maval taluka )

मावळ तालुक्यात नद्या, धरणे असुन देखील पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. आमदार सुनिल शेळके यांनी महिला-भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन तब्बल 114 पाणीपुरवठा योजना मंजूर करुन आणल्या. परंतू त्यातील अनेक योजनांचे काम निकृष्ट पद्धतीने झाल्याचे स्पष्ट दिसत असून अनेक योजनांची मुदत देखील संपली आहे. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याने आमदार शेळके आक्रमक झाले असून दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहेत.

पाणी योजनांच्या कामाची मुदत संपली असून ग्रामस्थांना पाणी मिळणार कधी?

tata tiago ads may 2025

केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील 114 पैकी फक्त 27 योजनांचे काम पूर्ण झाले असून सुमारे 87 योजनांचे काम मुदत संपूनही अत्यंत धिम्या गतीने सुरु असून काही ठिकाणी तर काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळणार कधी हा सवाल उपस्थित होत आहे. त्यावर अधिकारी आणि ठेकेदार कुठल्याही प्रकारची जबाबदारी न घेता टोलवाटोलवी करीत असल्याचे दिसून येत आहे. आमदार शेळके यांनी याबाबत 11 डिसेंबर रोजी मुद्दा उपस्थित करुन थर्ड पार्टी ऑडिटची मागणी केली होती. त्यानंतर लक्षवेधी उपस्थित करुन यावर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार याबाबत जाब विचारला होता.

अधिक वाचा –
– राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश
– मावळ तालुक्यातील 32 गावांत विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे सरकारच्या विविध विकास योजनांची माहिती
– ‘छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन वचन दिलंय, त्यावर ठाम आहे…’, पाहा मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?


dainik maval ads may 2025

Previous Post

‘अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ करा’, खासदार श्रीरंग बारणेंचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पत्र

Next Post

द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक! वीकएंड आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहन चालकांना जाहीर आवाहन, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Traffic-Jam-on-Mumbai-Pune-Expressway

द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक! वीकएंड आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहन चालकांना जाहीर आवाहन, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhushi-Dam

Bhushi Dam : लोणावळ्यातील भूशी डॅममध्ये दोन पर्यटक बुडाले, शोध सुरू । Lonavala New

June 8, 2025
Developed Agricultural Resolution Mission Farmers meeting organized in Urse village Maval taluka

विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील उर्से गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन । Maval News

June 8, 2025
Crime

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या बारा जणांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल । Dehu Road Crime

June 8, 2025
Meeting of Maval Taluka Shiv Sena office bearers in backdrop of upcoming local body elections

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval News

June 8, 2025
Tree plantation in Lonavala Khandala area with message of cleanliness health plastic freedom

लोणावळा, खंडाळा भागात वृक्षारोपणासह स्वच्छता, आरोग्य, प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश । Lonavala News

June 8, 2025
Accident

सोमाटणे टोलनाक्याजवळ भीषण अपघात, दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू । Talegaon Dabhade

June 8, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.