Dainik Maval News : चिंचवड येथून कामावरून दोन सख्खे भाऊ घरी जात होते. त्यावेळी रस्त्यात दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात दोघा भावांचा मृत्यू झाला.
हा अपघात मंगळवारी (दि.15) रात्री घडला. योगेश राजोरिया (वय 34), दीपक राजोरिया (वय 31, रा. पारशीचाळ, देहूरोड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
योगेश आणि दीपक हे चिंचवड येथे काम करत होते. मंगळवारी रात्री ते कामावरून सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी जात होते. रस्त्यात अचानक दुचाकी घसरल्याने योगेश आणि दीपक रस्त्यावर पडले.
दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच