Dainik Maval News : लोणारी समाज सेवा संघ, श्री क्षेत्र देहू यांच्या तर्फे दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबवत असतात, त्यापैकी एक म्हणजे इयत्ता १० वी व १२ वी सन २०२४ – २०२५ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीचा सत्कार समारंभ कार्यक्रम रविवारी, २९ जून २०२५ रोजी संपन्न झाला.
प्रथम लोणारी समाजाचे भीष्म पितामह स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले आणि कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. श्री क्षेत्र देहू परिसरात लोणारी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. चालू वर्षी देहू लोणारी समाज सेवा संघातर्फे प्रथमच गुणवंत विद्यार्थी सत्कार व गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.
एकूण १० विद्यार्थ्यांना संघातर्फे सन्मान पत्र व गौरव चिन्ह ट्रॉफी देऊन विश्वस्त मंडळातील संचालकाडून गौरविण्यात आले. तसेच इथून पुढे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असे विश्वस्त मंडळानी ठरवले आहे.
विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आभ्यासात सातत्य ठेवणं महत्त्वाचे राहील तर आपला विद्यार्थी स्पर्धेत टिकून राहील. त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचणे शक्य होईल. विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचा आणि आपल्या समाजाचा नावलौकिक वाढवावा. अशा शुभेच्छा सर्व गुणवंत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लोणारी समाज सेवा संघ श्री क्षेत्र देहू यांच्या कडून देण्यात आल्या.
सत्कार समारंभ कार्यक्रमात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपली भविष्यातील ध्येय धोरणे सांगितली तसेच याप्रसंगी संघाचे मार्गदर्शक अजित गंगनमले, एकनाथ राणे, सुरेखा आवटे , पुनम ताई नरळे, संस्थापक अध्यक्ष अमोल जयवंत करांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी चहा पाण्याची व्यवस्था संघातर्फे करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संघाचे उपाध्यक्ष भगवंत आवटे यांनी मानले.
श्री क्षेत्र देहू लोणारी समाज सेवा संघातर्फे गेल्या दीड वर्षापासून सामाजिक विविध कार्यक्रम घेऊन सर्वांच्या अभिनंदनास पात्र ठरत आहे. पुढील सामाजिक कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा! (वार्तांकन – हरिभाऊ खंडेराव पाटसकर, पंढरपूर)
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away
– “कृष्ण मेघांची छाया हरपली…” स्व. कृष्णराव भेगडे यांचे कधीही न पाहिलेले फोटो – पाहा फक्त दै. मावळवर । Krishnarao Bhegde Passes Away
– मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक