महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 55व्या वाढदिवसाला (दिनांक 14 जून) पक्षाच्या देहूरोड शहर शाखा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनसे महिला आघाडी अध्यक्षा ज्योती पिंजन, मावळ मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर आदी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राज ठाकरे यांचा बुधवारी (दिनांक 14 जून) 55वा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना देहूरोड शहर शाखा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, मनसे महिला आघाडी अध्यक्षा ज्योती पिंजन आदी उपस्थितीत होते. यावेळी शहर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आणि त्यांना नियुक्ती पत्रे वाटप करण्यात आली. ( dehuroad city branch office inaugurated on birthday of MNS president raj thackeray )
देहूरोड अध्यक्ष सुरेश भिगानिया, शोभा कळसकर-अध्यक्ष देहूरोड, तानाजी तोडकर, सचिन शिंगाडे, साहेबराव तेलगू, दिपक भालेराव, किरण गवळी, रुपेश जाधव, अमर कळसकर तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पवनमावळातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर
– तळेगाव दाभाडेतील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये बाल कर्करोग विभाग आणि ब्लड स्टोअरेज सेंटर सुरू