शेतीपूरक व्यावसाय असलेला आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आशादायी असलेल्या पोल्ट्री व्यवसायाला ग्रामपंचायतीकडून कर आकारण्यात येतो. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून शेतकऱ्यांच्या पोल्ट्री शेडवर आकारण्यात येत असलेली घरपट्टी म्हणजेच पोल्ट्री टॅक्स माफ करण्यात यावी, अशी मागणी मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या विशेष सभेत करण्यात आली. ( Maval Taluka Poultry Yoddha Association )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगाव मावळ येथे मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटेनेची विशेष सभा उद्योजक एकनाथ गाडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव वायकर, संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष केदारी, उपाध्यक्ष उत्तम शिंदे, संतोष घारे, सोमनाथ राक्षे, सचिव प्रविण शिंदे, सहसचिव महेश कुडले, खजिनदार विनायक बंधाले, सचिन आवटे, संभाजी केदारी, संभाजी शिंदे आदी उपस्थित होते. ( Demand for waiver of tax levied by gram panchayat on poultry business )
अधिक वाचा –
देहुरोडमध्ये ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मारण्याचा कट’ ? एका फोनने खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण
कोण होणार वडगावची महासुगरण 2022 ! आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी स्पर्धा, जाणून घ्या