Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पर्यायी रस्त्याचे (मिसिंग लिंक) काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या जूनपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, असा अंदाज आहे. दरम्यान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिसिंग लिंक मार्गाला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आमदार पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, खंडाळा घाटातील हा मार्ग ब्रिटिशांना दाखविण्याचे ऐतिहासिक कार्य वीर शिंग्रोबा धनगर यांनी केले होते. मात्र, स्वातंत्र्याची मागणी केल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांच्या बलिदानाची दखल घेऊन बोरघाट मिसिंग लिंकला त्यांचे नाव देण्याची गरज असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.
धनगर समाजातील या महान हुतात्म्याचे सदैव स्मरण व्हावे यासाठी बोरघाटात नव्याने तयार करण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा बोगदा’ असे नाव द्यावे. वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे शौर्य आणि त्यांचा इतिहास नव्या पिढीला समजावा व त्यांच्या कार्याला उचित सन्मान मिळावा, यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे पडळकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City