Dainik Maval News : मावळ तालुक्यातील आरोग्य सेवासुविधेत मैलाचा दगड ठरेल असेल भव्यदिव्य उपजिल्हा रुग्णालय कान्हे येथे बांधून तयार झाले आहे. लवकरच या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येईल. तत्पुर्वी या रुग्णालयाच्या नामकरणावरून चर्चा होताना दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कान्हे फाटा येथे उभारण्यात आलेल्या नवीन उपजिल्हा रुग्णालयाला मावळ तालुक्याचे माजी आमदार स्व. रघुनाथराव सातकर यांचे नाव देण्यात यावे, तसेच रुग्णालयाच्या आवारात त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारावा अशी मागणी आमदार सुनील शेळके यांच्याकडे करण्यात आली आहे.
- जांभूळ गावचे माजी सरपंच संतोष जांभुळकर, साते गावचे माजी सरपंच प्रकाश आगळमे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, टाकवे गावचे माजी सरपंच बाबाजी गायकवाड, युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गणेश काजळे यांनी आमदार सुनिल शेळके यांना लेखी निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
रघुनाथ दादा सातकर यांचे कार्य –
स्व. रघुनाथराव सातकर यांचे सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्य हे संस्मरणीय असून सरपंच, सभापती, आमदार या पदावर काम करत असताना गोरगरीब व सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचे प्रामाणिक काम केले. वारकरी सांप्रदायाचा वसा व वारसा टिकवण्यासाठी स्वत जबाबदारी घेऊन मावळ तालुका वारकरी सांप्रदयासाठी आपले आयुष्य खर्ची केले.
राजकारणातील एक स्पष्टवक्ता, हजरजबाबी व विधानसभेत मावळातील एक बुलंद आवाज म्हणुन ओळख निर्माण केली होती. वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख, गोपिनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार, हर्षवर्धन पाटील, नानासाहेब नवले, मदन बाफना यांच्याशी घनिष्ठ संबध निर्माण करून मावळ तालुक्यात अनेक विकासाचे प्रकल्प आणण्यास ते यशस्वी झाले. त्यामुळे त्यांचे नाव या रुग्णालयाला देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– मावळातील 5 शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार ; अजिवली येथील आदर्श शिक्षक मनोजकुमार क्षीरसागर यांचाही गौरव
– वडगाव मावळ येथील बाल संरक्षण शिक्षण परिषदेला 300 शिक्षकांची उपस्थिती । Maval News
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतले दगडूशेठ गणपती आणि लालबागचा राजाचे दर्शन । MLA Sunil Shelke