छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा महाविकास आघाडीच्यावतीने लोणावळा इथे निषेध करण्यात आला. लोणाळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे राज्यपालांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आंदोलकांकडून राज्यपाल कोश्यारींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत, त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांची राज्यपालपदावरुन तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ( Derogatory statement about Chhatrapati Shivaji Maharaj By Governor Bhagat Singh Koshyari )
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर, बाळासाहेब पायगुडे, नारायण आंबेकर, नारायण पाळेकर, राजू बोराटी, संध्या खंडेलवाल, उमा मेहता, पुष्पा भोकसे आदी यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ठाकरे गटाकडून मावळ लोकसभा उपजिल्हाप्रमुखपदी रोमी संधू यांची निवड झाल्याने पदाधिकाऱ्यांत नाराजी?
– व्हिडिओ: खोपोलीच्या दिवेश पालांडे आणि पायल मरागजे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड