मावळ तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि. 3 ऑक्टोबर) पुणे येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत पवना व इंद्रायणी नदीवर सुरु असलेली पुलांची कामे, ग्रामीण भागातील मुख्य रस्ते, प्रशासकीय इमारती या कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली.
‘मावळ तालुक्यात पावसाळ्यामुळे बंद असलेल्या कामांना लवकर सुरुवात करावी. कामांचा दर्जा गुणवत्तापूर्ण ठेवून कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा’ अशा सुचना आमदार सुनिल शेळके यांनी बैठकीत केल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या बैठकीला आमदार सुनिल शेळके यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण,अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील, उपअभियंता धनराज दराडे, सरपंच नानाभाऊ शेलार, विजय सातकर आदी उपस्थित होते. ( Development works which are closed due to monsoon in Maval should be started soon MLA Sunil Shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– तिकोणा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वप्नील तुपे यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election
– दिनांक 16 ऑक्टोबरला फॉर्म भरायला सुरुवात ते 6 नोव्हेंबरला मतमोजणी! वाचा ग्रामपंचायत निवडणूकांची संपूर्ण कार्यक्रमपत्रिका
– महाराष्ट्रातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर! 5 नोव्हेंबरला होणार मतदान, वाचा सविस्तर