व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागलेत’, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा घणाघात

पुण्यात युवा संसद 2023 मध्ये आयडिया ऑफ इंडिया या विषयावर चर्चा सत्र.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 28, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Sharad-Pawar

File Image


आपल्या देशामध्ये सध्या इंडिया आणि भारत दोन प्रकारचे देश आहेत. यामध्ये भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. महात्मा गांधी हे कायम खेड्यांकडे चला असा विचार मांडत होते, परंतु पंडित नेहरू यांनी या विचारांचा खून केला. युरोप आणि अमेरिकेच्या विचारांनी प्रभावी झालेल्या पंडित नेहरूंनी खेड्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे खेडी भकास झाली आणि शेतकरी उध्वस्त झाला. महात्मा गांधी यांचा खून माथेफिरु नथुराम गोडसे यांनी केला ही बाब निषेधार्ह आहे, परंतु महात्मा गांधी यांच्या विचारांचा खून पंडित नेहरु यांनी केला हे स्विकारावेच लागेल, अशी टीका राज्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसतर्फे संस्थेच्या नऱ्हे कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या युवा संसदमध्ये आयडिया ऑफ इंडिया या सत्रामध्ये सदाभाऊ खोत बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर, इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, विद्यार्थी नेता पार्थ पटले, कुणाल दंडवते आदी यावेळी उपस्थित होते. रंजना गायकवाड यांना आदर्श सरपंच पुरस्कार, संजय गिराम यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार तर राजेश पाडवी यांना आदर्श आमदार पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. ( Discussion Session On Idea Of ​​India At Youth Parliament 2023 In Pune Sadabhau Khot criticized Sharad Pawar )

सदाभाऊ खोत म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कष्ट करून देशाचा विकास केला, परंतु इंडियातील उद्योजकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करून देशाची लुबाडणूक केली. अशीच व्यवस्था कायम राहिली तर देशामध्ये समान विकास कसा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणारा विकास आपण निर्माण केला पाहिजे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, भारतामध्ये पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांच्या कारकिर्दीचे दोन भाग करता येतील. पंडित नेहरू यांना दिल्लीतील रायसोनी हिल्स हाच भाग भारत वाटत होता. परंतु नरेंद्र मोदी यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात विकासाची पाळेमुळे नेऊन पोहचवले खऱ्या अर्थाने आज भारताचा सर्वांगीण विकास होताना आपल्याला दिसत आहे.

बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले – सदाभाऊ खोत

सामाजिक कामाच्या नावाखाली बारामतीकर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच कुटुंबाची सत्ता अनुभवत आहेत. परंतु हे कुटुंब मात्र आपण सामाजिक काम करत आहोत असा देखावा करत स्वतःचेच खिसे भरत आहेत . कुटुंबाच्या मालकीचे साखर कारखाने शैक्षणिक संस्था निर्माण करून या कुटुंबाने बारामतीकरांना वाऱ्यावर सोडले. यामुळे बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागले आहेत अशी टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली. ( Discussion Session On Idea Of ​​India At Youth Parliament 2023 In Pune Sadabhau Khot criticized Sharad Pawar )

अधिक वाचा –

– राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाची धडक कारवाई; गोवा बनावटीची दारूसह 62 लाखांचा मुद्देमाल जप्त
– संजय गांधी निराधार योजनेतील 43 पात्र लाभार्थ्यांना शंकरराव शेळके यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप । Talegaon Dabhade


Previous Post

राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाची धडक कारवाई; गोवा बनावटीची दारूसह 62 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

मावळ तालुक्यातील सांगिसे गावाजवळील जंगलात बिबट्याचा वावर – पाहा व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Leopard-Spotted-In-Forest-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील सांगिसे गावाजवळील जंगलात बिबट्याचा वावर - पाहा व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
thrill of shivkalin sports in Vadgaon Maval on day of Dhulwad new record in stone-lifting competition

धुलिवंदनाच्या दिवशी वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार ; दगडीगोटी उचलण्याच्या स्पर्धेत ४०१ बैठकांचा नवा विक्रम

March 4, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.