Dainik Maval News : आमदार सुनील शेळके जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना या दोन महत्वाच्या सामाजिक योजनेअंतर्गत एकूण 128 लाभार्थींना मंजुरी पत्रकांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमात नबीलाल अत्तार, गणेश तळपे, रूपेश सोनूने, ऋषिकेश गायकवाड आणि केदार बावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
योजना कशा आहेत?
संजय गांधी निराधार अनुदान योजना ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत, निराधार, अपंग, विधवा व घटस्फोटित महिलांसाठी राबविली जाते. या योजनेत दरमहा आर्थिक सहाय्य देऊन त्यांचा आधार वाढवला जातो. श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना ही 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असून त्यांना दरमहा ठराविक रक्कम निवृत्ती वेतन स्वरूपात दिली जाते, जेणेकरून त्यांचे वृद्धत्व सन्मानाने व्यतीत होऊ शकेल.
लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल प्रशासन आणि आमदार कार्यालयाचे आभार मानले. मंजुरी पत्रक स्वीकारताना अनेक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार