वडगाव शहरातील आदिवासी समाजातील अनेक कुटुंबीय गेले कित्येक वर्षांपासून जातीच्या दाखल्यापासून वंचित होते. जातीचे दाखले नसल्याने शैक्षणिक सुविधा, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यात अडचण येतात. कारण अशा अनेक योजनांसाठी जात प्रमाणपत्र अत्यावश्यक असते. परंतू पूर्वज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहिल्याने हे दाखल मिळवणे हयात पिढीला शक्य होत नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो, किंवा मुले शिक्षणापासून वंचित राहतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जातीचा दाखला आणि असे अन्य दाखले काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, तसेच सरकारी कार्यालयात खटे मारणे हे हातावर पोट असलेल्या नागरिकांसाठी शक्य नसल्याने ते दाखल्यांपासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन मागील चार-पाच वर्षांपासून आमदार सुनिल शेळके यांनी मावळ तालुक्यात खास अभियान राबवले. ज्याअंतर्गत आदिवासी बांधवांसाठी जातीचे दाखले काढून देणे आणि वाटप करणे सुरु केले. त्यातून अनेक कुटुंबीयांचा दाखल्यांचा वनवास संपला. त्यातूनच त्यांची मुले देखील शिक्षणाच्या प्रवाहात आली. ( Distribution of caste certificates to 42 tribal families of Vadgaon Maval City )
वडगाव मावळ येथेही मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरातील ठाकर समाजामधील सुमारे 42 कुटुंबीयांना नुकतेच जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या व्यतिरिक्त आणखीन काही कुटुंबीयांना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून येत्या पंधरा दिवसांच्या कालावधीत उर्वरित कुटुंबीयांना जातीचे दाखले दिले जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा वडगावचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार
– मान्सून तोंडावर… मावळ तालुक्यात शेतीच्या मशागतीची कामे वेगात, पेरणीची कामे अंतिम टप्प्यात !
– सर्वांची लाडकी ‘लालपरी’ (एसटी बस) आज 76 वर्षांची झाली…