सीआयई ऑटोमोटिव्ह इंडिया या कंपनीकडून मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडिवळे येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे कीट वाटप करण्यात आले. या कीटमध्ये विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, बूट,वह्या, पेन, कंपास, चित्रकला वही अशा शैक्षणिक उपयुक्त अनेक गोष्टी देण्यात आल्या. हे सर्व साहित्य पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला होता. ( distribution of educational materials by CIE India Company to students of wadiwale village school )
कीट वाटपावेळी सीआयई ऑटोमोटिव्ह इंडिया (CIE Automotive India) कंपनी व्यवस्थापनाकडून एचआर प्रदिप चौगुले, सागर पवार, युनियन प्रतिनिधी दत्ताजी मोहिते, प्रमोद खोत, नितेश शहा आदी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद, शिक्षण व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कंपनी प्रतिनिधींचा यथोचित सत्कार करुन आभार मानण्यात आले.
पूर्वीची महिंद्रा अन् सध्याच्या सीआयई इंडिया कंपनीकडून सातत्याने परिसरातील गावांना अशाप्रकारे मदत केली जात आहे, तसेच शैक्षणिक सहाय्य केले जात आहे. कंपनीकडून अनेकदा असे समाजपयोगी उपक्रम राबवण्यात आले आहेत. या सर्व गोष्टींबाबत शाळेचे मुख्याध्यापक कोल्हे सर, उप-मुख्याध्यापिका इंगळे मॅडम, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष कुलदीप थोरवे, ग्रामस्थ शामराव थोरवे, ग्रामसेवक परमेश्वर गोमसाळे यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन चेतन बाळासाहेब थोरवे यांनी केले. तसेच कंपनी व्यवस्थापनाने असे उपक्रम सातत्याने रावबून गरजू विद्यार्थ्यांच्या जडणघडीत योगदान द्यावे आणि गावाला सहकार्य करावे, असे आवाहनही थोरवे यांनी केले. ( distribution of educational materials by CIE India Company to students of wadiwale village school )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– शाब्बास पोरांनो..! पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांचे नाट्यछटा स्पर्धेत घवघवीत यश, आता थेट जिल्हा पातळीवर भिडणार
– ‘लोणावळा वुमन्स फाउंडेशन’च्या वतीने ‘स्वतंत्र महिला’ कार्यक्रमाचे आयोजन; IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून मार्गदर्शन
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील विविध समस्या आणि नागरिकांच्या तक्रारीबाबत आमदार शेळकेंनी घेतली अध्यक्षांची भेट