Dainik Maval News : मावळ तालुक्यातील सुवासिक इंद्रायणी खरीप भाताचे उत्पादन व शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी मावळ ऍग्रोच्या वतीने शेतकऱ्यांना शुद्ध व प्रमाणित इंद्रायणी बियाणे त्याचबरोबर सेंद्रिय खताचे वाटप करण्याचा समारंभ मावळ ऍग्रोचे संस्थापक अध्यक्ष माऊली दाभाडे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार सुनील शेळके व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या संकल्पनेतून गेली तीन वर्ष हा उपक्रम चालविला जात आहे.
- मावळ ऍग्रोच्या वतीने प्रमाणित इंद्रायणी जातीचे बियाणे वाटप समारंभास भाऊसाहेब बांगर,सदाशिव शिंदेपाटील, नाथाभाऊ गायकवाड, लक्ष्मण शिरसट, दत्तात्रय आंद्रे, नथू गायकवाड, सोमनाथ गायकवाड, बाळू येवले, पांडुरंग भानुसघरे, पांडुरंग मावकर, मधुकर कडू सखाराम कडू, नारायण ठाकर तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी गुलाब खांदवे, वसुली अधिकारी नीरज पवार, सचिव संघटनेचे अध्यक्ष गणपत भानुसघरे आदी यावेळी उपस्थित होते.
तालुक्यातील खरीप भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी एक एकर भात लागवडीसाठी ३० किलो शुद्ध व प्रमाणित बियाणे देण्यात येणार असून त्याचबरोबर सेंद्रियखते ही दिली जात आहेत तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भात मावळ ऍग्रो पुन्हा हमी भावापेक्षा जास्त दराने विकत घेणार आहे. जे शेतकरी या प्रकल्पात सहभागी होणार आहेत त्यांच्या उत्पादित मालाला मावळ ऍग्रो प्रति ४० रुपये किलो दर देणार आहे असे मावळ ऍग्रोच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
इंद्रायणी भात पीक घेताना कोणतेही रासायनिक खत अथवा औषधे वापरू नयेत केवळ सेंद्रिय खतावरच हे उत्पादन घ्यावे असे आवाहन माउली दाभाडे यांनी केले आहे.
यंदा मिळणार उच्चांकी भाव….
मावळ ऍग्रो कडून इंद्रायणी भात खरेदीला पहिल्या वर्षी प्रति कि २४रूपये, दुसऱ्या वर्षी प्रति किलो २८ रुपये तिसऱ्या वर्षी प्रति किलो ३२ रुपये असा हमीभावापेक्षा जास्त दर दिला होता तर शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतावर पिकवलेल्या भातावर मागील वर्षी ४० रुपये भाव दिला होता याही वर्षी ४० रुपये प्रति किलो भाव देण्यात येणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यात ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात ; मावळमधील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणार अंमलबजावणी
– ‘नियोजन करून दुपारी दीडची लोकल पुन्हा सुरू’, खासदार श्रीरंग बारणे यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना
– मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
– मोठी बातमी : राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी ; महसूलमंत्र्यांचे आदेश