भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचा समारोप करीत 76 व्या स्वातंत्र्यदिनाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण वडगाव शहर सज्ज झाले आहे. शनिवारी (दिनांक 12 ऑगस्ट) मोरया महिला प्रतिष्ठान आणि मोरया ढोल पथक यांच्या माध्यमातून वडगाव शहरवासीयांसाठी सुमारे 2000 तिरंगा ध्वजाचे विनामूल्य वाटप करण्यात येत आहे. या देशभक्तीपर कार्यक्रमाचा शुभारंभ वडगावचे मा नगराध्यक्ष मयुर ढोरे आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात करण्यात आला. ( Distribution of Indian tricolor flag in Vadgaon town through Morya Pratishthan )
“हर घर तिरंगा” हा ऐतिहासिक सोहळा उत्साहात साजरा करावा असे आवाहन मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी केले. मोरया महिला प्रतिष्ठान व मोरया ढोल पथक च्या माध्यमातून वडगाव व कातवी मधील रहिवाशांना शनिवार दिनांक 12 ते 14 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रध्वज विनामूल्य भेट देण्यात येणार आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी तिरंगा ध्वज घेऊन जावे तसेच वडगाव कातवीतील नागरिकांनी आपल्या घरावरती राष्ट्रध्वज लावून “हर घर तिरंगा” या अभियानामध्ये उत्फुर्तपणे सहभागी व्हावे व राष्ट्रध्वज लावताना राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज? मुंबई-पुणे सोडून कालपासून साताऱ्यातच मुक्काम, नेमकं काय झालंय? वाचा सविस्तर
– ‘लोणावळा वुमन्स फाउंडेशन’च्या वतीने ‘स्वतंत्र महिला’ कार्यक्रमाचे आयोजन; IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून मार्गदर्शन
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील विविध समस्या आणि नागरिकांच्या तक्रारीबाबत आमदार शेळकेंनी घेतली अध्यक्षांची भेट