Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने शहरातील नोंदणीकृत 378 दिव्यांग लाभार्थींना अनुदानाचे वाटप नुकतेच करण्यात आले. त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा दिव्यांग कल्याण विभाग आपल्या हद्दीतील दिव्यांगांना दरवर्षी अनुदानाचे वाटप करत असतात. नगरपरिषदेने या वर्षीच्या अर्थसंकल्पात सर्व दिव्यांग व्यक्तींकरता सुमारे 80 लाख 98 हजार रुपयांची तरतूद केलेली असून या तरतूद केलेल्या रकमेतून 378 लाभार्थ्यांना एकूण तीन हप्त्यात रक्कम दिली जाते.
यावर्षी आत्तापर्यंत एप्रिल 2024 मध्ये पहिला हप्ता, तर ऑगस्ट 2024 मध्ये दुसऱ्या हप्त्याचे वाटप केले. शिल्लक राहिलेला तिसरा आणि शेवटचा हप्ता येथे मार्चपूर्वी देण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दिव्यांगाची ही रक्कम नगर परिषद संबंधित दिव्यांग व्यक्तीच्या बँक खात्यावर पाठवून देत असते.
शहरातील प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना 7 हजार 122 रुपयांचा हप्ता संबंधित दिव्यांगाच्या खात्यावर नुकताच वर्ग करण्यात आला. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम उपमुख्याधिकारी ममता राठोड यांचे मार्गदर्शनाखाली दिव्यांग कल्याण विभागाचे प्रमुख जयंत मदने यांनी हे वाटपाचे नियोजन केले होते. ( Distribution of Money to 378 disabled beneficiaries registered by Talegaon Nagar Parishad )
अधिक वाचा –
– साखर कारखान्यांना सहकारी बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी आता संपूर्ण संचालक मंडळावर
– आनंदाची बातमी ! राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा मिळणार अखंडित वीज, मंत्रिमंडळाचा निर्णय – वाचा अधिक
– मोठी बातमी ! राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना देखील केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, राज्य सरकारचा निर्णय