लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या संकल्प नशा मुक्ती अभियान आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या आजादी का अमृत महोत्सव – मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत कामशेत पोलीस स्टेशनच्या वतीने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय अॅन्ड ज्युनिअर कॉलेज कामशेत इथे ह्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ( Distribution of Prizes of Essay Competition organized by Kamshet Police )
ह्यात विद्यालयातील बारावीचे वर्गातील (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स) विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ, गौरव चिन्ह व प्रमाणपत्र वाटप समारंभ मंगळवार (दिनांक 29 ऑगस्ट) रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वेळेत संपन्न झाला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी, माध्यमिक विद्यालयातील शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी, प्राचार्य आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पोलीस अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी पोलिसांकडून विद्यार्थ्यांमध्ये नशेच्या दुष्परिणाम बाबत जनजागृती करण्यात आली. तसेच आपला देश नशा मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले गेले. “राष्ट्रभावना राष्ट्रप्रेम वाढीस लागावे आणि नशा मुक्त निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करून देशसेवेसाठी, तसेच समाजसेवेसाठी योगदान द्यावे. यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,” अशी माहिती कामशेत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अबब…! पवनानगर इथे आढळला तब्बल 9 फुटी अजगर, सर्पमित्रांनी दिले जीवदान
– वडगावमधील राज्यस्तरीय बेंचप्रेस स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना घवघवीत यश; अशोक मते यांचा खास सन्मान
– राज्यपाल रमेश बैस यांचा लोणावळा दौरा, स्वामी कुवलयानंद योग पुरस्काराचे केले वितरण, कैवल्यधाम योग संस्थेलाही दिली भेट