कल्हाट – निगडे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन रविंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. सोमवारी (दि. 24 जून) त्यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने एसइसी सेंटर नायगाव येथील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यासह शाळेच्या प्रांगणात वृक्षरोपण देखील करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वाढदिवसनिमित्त होणारा खर्चाचा अपव्यय टाळून अनाथाश्रमाला वस्तूरूपी भेट दिल्याबद्दल रविंद्र पवार यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. यावेळी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण ठाकर, माजी सरपंच गुलाबराव गभाले, आदर्श सरपंच प्रवीण भवार, अनंता पावशे, नागू ढोंगे, सुजित सातकर, मनोज कदम, आदिनाथ डोळस, किरण हेमाडे, भाऊसाहेब साबळे, अर्जुन साबळे, रोहिदास खांडभोर आदीजण उपस्थित होते. ( Distribution of school material and food to students of Divyang school on occasion of birthday Maval News )
अधिक वाचा –
– ‘आम्ही इथले भाई…’ असे म्हणत तळेगाव शहरात गोळीबार करणाऱ्या गुंडांना नाशिकमधून अटक, 7 गावठी पिस्तूल जप्त । Talegaon Crime
– इंदोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप नाटक यांची बिनविरोध निवड । Maval News
– 1972 साली धरण झाले, 7 आमदार झाले, मात्र पवना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागायला 2024 साल उजाडले । Pavana Dam