मावळ तालुक्यातील आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्यावतीने गणवेशाचे वाटप करण्यात आले. पवनमावळातील दुर्गम भागात असणाऱ्या या शाळेत अनेक ठिकाणांहून मुले शिक्षणासाठी येत असतात. पैकी अनेक विद्यार्थी हे आदिवासी कुटंबातील तर गरीब कुटुंबातील आहेत. अशा गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्यावतीने शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. ( Distribution Of School Uniforms To Students At Ajivali By Rotary Club of Talegaon Dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रोटरी क्लबचे डॉ. सूर्यकांत पुणे, विकास उभे, धनंजय मथुरे, प्रमोद अण्णासाहेब दाभाडे आणि संदीप पानसरे, सोनबा गोपाळे गुरुजी आदीजण यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रमोद दाभाडे म्हणाले की, ‘भविष्य काळात देखील गरजू विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्यासाठी मदत केली जाईल.’ तसेच, ‘रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहेत. तसेच मावळ तालुक्यातील मुलांना शैक्षणिक मदत व्हावी, या हेतूने काम करत आहेत’, असे कौतुकाचे उद्गार सोनबा गोपाळे गुरुजी यानी काढले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रमेश अरगडे यांनी केले, तर सूत्रसंचालन रोहिणी देशपांडे यांनी केले. आभार प्रदर्शन आदर्श शिक्षक गणेश पाटील यांनी मानले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले. रोटरी क्लबतर्फे डॉ सूर्यकांत पुणे, मंगेशजी गारोळे, अध्यक्ष अनिशजी होले यांनी विशेष सहकार्य केले.
अधिक वाचा –
– एकविरा देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी 40 कोटींचा ‘डीपीआर’, लवकरच निविदा प्रसिद्ध होणार
– मावळच्या दोन तरूणांची जबरदस्त कामगिरी; तालुक्यात आढळणाऱ्या 36 जातीच्या सापांबद्दल शोधनिबंध प्रसिद्ध, नक्की वाचा