Dainik Maval News : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने लोणावळा विभागात 360 सभासद शेतकऱ्यांना 14 टन साखर सवलतीच्या दरात वाटण्यात आली. कारखान्याच्या संचालिका शुभांगी गायकवाड यांच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी सभासदांना साखरेचे वाटप करण्यात आले. लोणावळा शहरात साखर कारखान्याचे जवळपास 415 सभासद शेतकरी आहेत.
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, संचालक सखाराम गायकवाड, संचालिका शुभांगी गायकवाड, डॉ. किरण गायकवाड, काँग्रसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, नासीर शेख, विनोद होगले, मंजुश्री वाघ, दिलीप सुराणा, सुरेश गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. संचेती लॉन येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 दरम्यान साखर वाटप सुरू होती.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारूगोळा जवळ बाळगण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी
– शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी पदी सोमनाथ ताकवले यांची नियुक्ती, एस.डी. वरक यांच्याकडून स्वीकारला कार्यभार
– रेल्वेत हरवलेली बॅग पुन्हा हाती आली आणि तीचे दुःख हरवले ! रेल्वे पोलीस अनिता रायबोले यांना सॅल्यूट