लोणावळा ( Lonavla ) येथे एका विवाहित महिलेचा सासरकडील काही मंडळींनी कौटुंबिक छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित फिर्यादी महिलेने लोणावळा शहर पोलिसांत ( Lonavla City Police ) फिर्याद दाखल केली आहे. पती, सासू यांसह कुटुंबातील 5 जणांविरोधात शारिरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार फिर्यादीने नोंदवली आहे. ( Harassment of Married Woman in Lonavala City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला हिने लोणावळा पोलिसांत सासरकडील कुटुंबियांविरोधात हिंसाचार आणि छळवणूकीची ( Harassment of Married Woman ) तक्रार दाखल केली आहे. दिनांक 11 जून 2016 पासुन ते आजपर्यंत (2022) सातत्याने सासरकडील कुटुंबीयांनी यात पती, सासू, नणंद, दीर, जाऊ सर्वजण राहणार सोनार गल्ली, एफ-48 मौजे लोणावळा) यांच्याकडून आपल्याला मारहाण करणे, अपमानास्पद बोलणे, जातीवरुन बोलणे आदी प्रतारे छळ केल्याचे ( Family Harassment of Married Woman ) फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. तसेच दिराने एकदा शारिरिक लगट करण्याचा प्रयत्न केल्याचाही गंभीर आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सासरकडील या 5 जणांविरोधात भारतीय दंड संहिता कायदा कलम 498 (अ) 354, 323, 504, 506, 34 अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंद कायदा 1989 चे 3 (1) (r) (s), 3 (2) (va), 6 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरील प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक डुबल साहेब हे करत आहेत. ( Domestic Harassment of Married Woman By In-laws At Lonavala city )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! कामशेतजवळ भीषण अपघात, मंत्री संदीपान भुमरेंच्या बंधूचा मृत्यू I Kamshet Accident
– ‘उठा उठा दिवाळी आली… किल्ले बनवायची वेळ झाली’, मावळमधील कुंभार समाजाकडून मातीचे सैनिक बनवायची लगबग