Dainik Maval News : मावळ तालुक्यातील आढले बुद्रुक येथे निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालविल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाच्या अंगावर पडला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी ही घटना घडली.
बाळू सोपान चांदेकर (वय ४७, रा. आढलेखुर्द, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. याप्रकरणी खंडू बारकू घोटकुले (वय ४६, आढले बुद्रुक, ता. मावळ) यांनी शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या शेतात ज्वारी पेरणीचे काम सुरु होते. बाळू चांदेकर हे ट्रॅक्टर वाहन चालवित होते. ट्रॅक्टरच्या साहाय्याने काम केल्यानंतर ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना ट्रॅक्टर पलटी झाला. त्यामध्ये अडकून बाळू चांदेकर यांचा मृत्यू झाला. शिरगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव । Maval Panchayat Samiti
– लोणावळ्यात मनसैनिकांनी कसली कंबर ! नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त शक्तीप्रदर्शन, शेकडोंचा पक्षप्रवेश । Lonavala MNS
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी

