व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जांभूळ गावात महिलांसाठी प्रशांतदादा भागवत युवा मंच आयोजित “मनोरंजन संध्या २०२५” कार्यक्रम उत्साहात ! Prashant Bhagwat

या भव्य आयोजनामुळे जांभूळ परिसरात आणि संपूर्ण मावळ तालुक्यात प्रशांतदादा भागवत यांच्या कार्यपद्धतीबद्दल नव्या उत्साहाची लाट उसळली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 11, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Prashant Bhagwat organized Manoranjan Sandhya 2025 program for women in Jambhul Village Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे महिलांसाठी खास पर्व म्हणून “मनोरंजन संध्या २०२५” हा भव्य कार्यक्रम जांभूळ येथे अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास जांभूळ परिसरातील माता-भगिनींनी प्रचंड प्रतिसाद दिला. हसत-खेळत, गाणी, नृत्य आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांनी आपला लपलेला कलाविष्कार सादर करत रंगतदार वातावरण निर्माण केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्रशांतदादा भागवत हे आमदार सुनील अण्णा शेळके यांचे विश्वासू शिलेदार असून, सध्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. त्यांच्या पुढाकारातून महिलांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गावोगावी त्यांना प्रचंड जनसमर्थन लाभत आहे. “मनोरंजन संध्या”च्या माध्यमातून त्यांनी महिलांशी आत्मीय संवाद साधत, समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाला तालुका युवक अध्यक्ष किशोर भाऊ सातकर, आदर्श सरपंच संतोष भाऊ जांभुळकर, उपसरपंच एकनाथ आप्पा गाडे, मा. उपसरपंच अंकुश भाऊ काकरे, मा. सरपंच नागेश ओव्हाळ, मावळ तालुका विद्यार्थी अध्यक्ष सुशांत बालगुडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य रुपाली गायकवाड, स्नेहल ओव्हाळ, तृप्ती जांभुळकर, कल्पना काकरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ईश्वर काकरे, प्रभाकर जांभुळकर, संजू जांभुळकर, विवेक काकरे, अरुण जांभुळकर, संदीप गाडे, भानुदास शिंदे, तसेच हिंदुतेज मित्र मंडळाचे सर्व सभासद उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

विविध स्पर्धांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. विजेत्यांमध्ये — प्रथम क्रमांक शिल्पाताई पोटवडे, द्वितीय क्रमांक अश्विनीताई पोटवडे, तृतीय क्रमांक जयश्रीताई देशमुख, चतुर्थ क्रमांक जनाबाई जांभुळकर, पाचवा क्रमांक प्रतीक्षा ताई काकरे, सहावा क्रमांक शितलताई वायकर, सातवा क्रमांक वैष्णवीताई जांभुळकर, आठवा क्रमांक पुष्पाताई देशमुख, नववा क्रमांक मोनिकाताई जांभुळकर आणि दहावा क्रमांक रोहिणीताई काकरे यांनी पटकावला.

या भव्य आयोजनामुळे जांभूळ परिसरात आणि संपूर्ण मावळ तालुक्यात प्रशांतदादा भागवत यांच्या कार्यपद्धतीबद्दल नव्या उत्साहाची लाट उसळली आहे. महिलांच्या सहभागातून उभे राहिलेले हे यश, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांतदादा भागवत यांच्या बाजूने पोषक वातावरण निर्माण करणारे ठरले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव । Maval Panchayat Samiti
– लोणावळ्यात मनसैनिकांनी कसली कंबर ! नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त शक्तीप्रदर्शन, शेकडोंचा पक्षप्रवेश । Lonavala MNS
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी


dainik maval jahirat

Previous Post

कोण म्हणतं, गहाळ झालेला मोबाईल पुन्हा मिळत नाही? ५ महिन्यांपूर्वी पवना धरण परिसरात हरविलेला मोबाईल पोलिसांनी ‘असा’ शोधून काढला

Next Post

शेतीकाम करताना झालेल्या अपघातात ट्रॅक्टरखाली सापडून चालकाचा मृत्यू, मावळमधील दुर्दैवी घटना । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

शेतीकाम करताना झालेल्या अपघातात ट्रॅक्टरखाली सापडून चालकाचा मृत्यू, मावळमधील दुर्दैवी घटना । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.