मावळ परिसरातील ड्रग्सचा वाढता विळखा रोखण्यासाठी आणि तरुणाईला नशेच्या आहारी जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी तसेच परिसर ड्रग्समुक्त करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस दलातर्फे लोणावळा उपविभागात सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पुढाकारातून संकल्प नशा मुक्ती अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंम’ली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाया हाती घेतल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दरम्यान आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे ताजे आणि नायगाव परिसरात काहीजण हे मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अं’मली पदार्थाची छुप्या पद्धतीने विक्री करत आहेत. त्यामुळे परिसरातील तरुणाई ड्र’ग्सच्या विळख्यात अडकत चालली आहे. बातमीचे गांभीर्य ओळखून सत्यसाई कार्तिक यांनी अत्यंत कमी वेळेमध्ये सदर आरोपींच्या येण्या-जाण्याचे मार्ग, त्यांची कार्यपद्धती इ.ची इत्यंभूत माहिती मिळवून पथकासह दिनांक 30 डिसेंबर 2023 चे रात्रीपासून मौजे ताजे परिसरात सापळा रचला होता. ( drug peddlers arrested in kamshet police station limit by IPS Satya Sai Karthik Team Pune Police )
- दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 2.25 वाजताच्या सुमारास आरोपी खंडू कुटे हा त्याच्या बाईकवरून ताजे गावाकडून पिंपलोळी गावाकडे येत आहे, अशी खात्री होताच पथकाने त्याला चहू बाजूंनी घेरले. परंतू पोलिसांची चाहूल लागताच आरोपी खंडू कुटे हा कारवाईच्या भीतीने बाईक भरधाव वेगात पळवत तेथून पसार होण्याचा प्रयत्न करू लागला. परंतू पोलीस पथकाने जीवाची पर्वा न करता आरोपी खंडू कुटे यास सिनेस्टाईलने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 30 ग्रॅम वजनाचा 90,000 किमतीचा विक्रीसाठी आणलेला अं’मली पदार्थ आणि त्याची पॅकिंग व विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकींगच्या पिशव्या असा एकूण सुमारे 1 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच, त्यानंतर दिनांक 31 डिसेंबर रोजी रात्री 8.55 वाजता सत्यसाई कार्तिक यांनी पथकासह नायगाव परिसरात सापळा रचला असता आरोपी 1) रोशन चंद्रकांत ओव्हाळ (वय 24 वर्ष, रा.नायगाव ता. मावळ) 2) अमित भरत भानुसघरे (वय 24 वर्ष, रा देवराम कॉलनी कामशेत) हे दोघे दुचाकीवरून अं’मली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेले असताना पथकाने त्या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्यांच्या अंगझडतीत दोघांकडे प्रत्येकी 5 ग्रॅम असा एकूण 30,000 रूपये किमतीचा अं’मली पदार्थ मिळून आला आहे.
वर नमूद दोन्ही कारवायांमध्ये 1 लाख 20 हजार रूपये किंमतीचा 40 ग्रॅम वजनाचे ड्र’ग्ज आणि एकूण 2 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल रहिस मुलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे विविध कलमान्वये कामशेत पोलीस स्टेशन इथे दोन स्वतंत्र गुन्हे नोंद कण्यात आली असून पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पोहवा सचिन गायकवाड, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पोहवा अंकुश नायकुडे, पोकॉ रहीस मुलानी, पोकॉ सुभाष शिंदे, पोकॉ अमोल ननवरे, पोकॉ अंकुश पवार, पो कॉ आशिष झगडे, होमगार्ड सागर दळवी यांच्या पथकाने केली आहे.
अधिक वाचा –
– बापरे बाप! लोणावळा उपविभागात तब्बल 510 वाहन चालकांवर कारवाई, 3 लाख 61 हजारांचा दंड वसूल । Lonavala News
– मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक व्हावे – मुख्यमंत्री । Maratha Reservation
– किल्ले तुंग दुर्गसंवर्धन प्रकल्पासाठी राज्य पुरातत्व विभागाकडून 1 कोटी 56 लाख निधी मंजूर । Tung Fort