Dainik Maval News : मद्यपान करून वाहन चालविणे पिंपरी-चिंचवड शहरातील दोघांना चांगलेच महागात पडले आहे. शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयाने मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या दोघांना 20 हजार रुपयांचा दंड तर, एकाला चार दिवसांची आणि एकाला तीन दिवसांची साधी कैदेची शिक्षा ठोठावली.
दत्तात्रय आतिश टिपरे (वय, 26 रा. साने चौक, चिखली) यांना चार दिवसांची तर राजकुमार गरजुप्रसाद भारती (वय 45, रा. गणेश मंदिर, नेहरुनगर) यांना तीन दिवसांची साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे.
पिंपरी वाहतूक पोलिसांनी मागील वर्षी दत्तात्रय टिपरे आणि राजकुमार भारती या दोघांवर मद्यपान करून वाहन चालविल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण मोटार वाहन न्यायालय शिवाजीनगर येथे सुनावणीसाठी दाखल करण्यात आले.
- न्यायालयाने दोघांना दोषी ठरवून दत्तात्रय टिपरे यांना 20 हजार रुपये आर्थिक दंड आणि चार दिवसांची साधी कैद तर राजकुमार भारती यांना 20 हजार रुपये आर्थिक दंड आणि तीन दिवसांची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहन चालक मद्य प्राशन करुन वाहने येगात तसेच वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून धोकादायकरित्या चालवित असतात. वाहन चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होत असतात. मद्य प्राशन करून वाहन चालविणारे वाहनचालक स्वतःचे तसेच इतरांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण करत असतात. अशा वाहनचालकांना वेळीच प्रतिबंध करणे गरजेचे असल्याने पिंपरी- चिंचवड वाहतूक शाखेमार्फत मद्यपान करून वाहन चालविणा-या चालकांविरोधात शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात येत असतो.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान