पुणे जिल्ह्यातील अनेक भागात सध्या पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. यातही डोंगर दऱ्यांचा भाग असलेले तालुके पावसात न्हावून निघत आहे. मावळ प्रमाणेच मुळशी तालुक्यात देखील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुळशी धरण परिसरात तर मागील चार दिवसांत पावसाने चांगलाच जोर धरला असून सततच्या पावसाने मुळशी धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ताम्हिणी परिसरात शनिवारी (21 जुलै) सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार 24 तासांत 350 मी.मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती. मुळशी धरणात जूनच्या अखेरीस जेमतेम 5 टक्के असलेला पाणीसाठा आता थेट 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. ( Due To Heavy Rain In Mulshi Taluka Water Storage In Dam Has Reached 40 Percent )
सध्या मुळशीच्या दावडी, ताम्हिणी, पिंपरी, आंबवणे, कुंभेरी, पोमगाव, नांदिवली, शेडाणी, मुळशी, वळणे परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने जोर धरल्यामुळे मोठ्या प्रमाणात धरणात पाण्याची आवक होत असून पाणलोट क्षेत्रातील डोंगरांवरून येणाऱ्या पाण्याने ओढे, नाले, धबधबे प्रवाहित होऊन धरणात पाण्याची आवक कायम आहे.
भातशेतीसाठीही अत्यंत महत्वाचा असलेला वरुणराजा सातत्याने बरसत असल्याने भात लागवड उरकण्याची सध्या शेतकरी घाई करत आहेत.
अधिक वाचा –
– इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मावळमधील प्रशासन अलर्ट, तहसीलदारांकडून तालुक्यातील दरडप्रवण गावांची पाहणी
– राज्यातील 41 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंढेंची दीड महिन्यात बदली, पुण्यातही मोठा बदल, वाचा सर्वकाही एका क्लिकवर