हिंदू धर्मियांचे श्रद्धेय असलेले शंकराचार्य ( shankaracharya ) स्वरुपानंद सरस्वती ( swaroopanand saraswati ) यांचे रविवारी दुःखद निधन झाले. शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचे मृत्यूसमयी वय 99 वर्षे होते. रविवारी दुपारच्या सुमारास मध्यप्रदेशमधील नरसिंगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मध्यप्रदेशातील ( Madhya Pradesh ) राज्यातील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी या छोट्याशा गावातील एका ब्राम्हण कुटुंबात शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचा 2 सप्टेंबर 1924 जन्म झाला होता. द्वारका आणि शारदा पिठाचे ( Dwarka Peeth ) स्वामी स्वरुपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक गुरू ( Religious leader ) म्हणून मानले जात. ( Shankaracharya Swami Swaroopanand Saraswati Passes Away )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
स्वातंत्र्य लढ्यातही होते योगदान;
शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचे स्वातंत्र्यलढ्यातही मोलाचे योगदान राहिले होते. 1942 मध्ये वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी क्रांतिकारी साधू म्हणून ते नावारुपाला आले होते. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याने त्यांना इतर क्रांतिकारांप्रमाणेच काशी येथील तुरुंगात 9 महिने तर मध्य प्रदेशातील तुरुंगात 6 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता.
द्वारका शारदा पीठ के शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। शोक के इस समय में उनके अनुयायियों के प्रति मेरी संवेदनाएं। ओम शांति!
— Narendra Modi (@narendramodi) September 11, 2022
द्वारका मठ आणि ज्योतिर मठाचे होते प्रमुख;
भारतात तेराशे वर्षांपूर्वी आदी गुरु भगवान शंकराचार्य यांनी सनातन धर्माचा विचार सर्व दूर पसरवण्यासाठी चार पीठांची निर्मिती केली. या पीठांच्या प्रमुखपदी शंकराचार्य नियुक्त केले. द्वारका मठ आणि ज्योतिर मठ यांचे मिळून तयार केलेल्या पीठाचे शंकराचार्य म्हणून जगतगुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे कार्यरत होते. ( Dwarka Peeth Shankaracharya Swami Swaroopanand Saraswati Passes Away At Age 99 )
अधिक वाचा –
लोणावळा शहरात विसर्जन मिरवणूकीनंतर सालाबादप्रमाणे शिवसेनेकडून महाप्रसादाचे वाटप
तब्बल 70 वर्षे ब्रिटनच्या महाराणी राहिलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन; जगभरातून श्रद्धांजली