मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ‘रयत विद्यार्थी विचार मंच’च्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. मावळ तालुक्यातील कचरेवाडी व करंजगाव पठार येथील जिल्हा परिषदेच्या 2 शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी वह्या आणि इतर स्टेशनरी साहित्य रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दोन्ही शाळांमध्ये मिळून जवळपास 7,500 रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य शाळेकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा बडगुजर यांनी मंचच्या मान्यवरांचे स्वागत करत ओळख करून दिली. रयत विद्यार्थी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्याबरोबरच संस्था त्यांच्या समवेत शैक्षणिक मदतीसाठी सोबत असल्याचे आश्वासन दिले. ( educational materials to students in remote areas of Maval taluka through Rayat Vidyarthi Vichar Manch )
संस्थेचे महासचिव संतोष शिंदे यांनी रयत विद्यार्थी विचार मंचाची भूमिका मांडली. राज्य संपर्कप्रमुख अतुल वाघमारे यांनी संस्थेची संकल्पना मांडताना विद्यार्थ्यांना देखील मोठे होऊन अशीच समाजाशी नाळ जोडण्यासाठी आवाहन केले. प्रा. विक्रांत शेळके यांनी मुलांशी मोकळ्या भाषेत संवाद साधत मुलांना हसवून त्यांना शिक्षण, करिअर , अभ्यास, खेळ या सर्वांना समान महत्व देत आयुष्य जगण्याविषयी मार्गदर्शन केले. मावळ तालुका उपाध्यक्ष सागर गायकवाड यांनी आभार मानले.
अधिक वाचा –
– होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन मार्फत 600 देशी झाडांची लागवड
– पालखी सोहळा काही तासांवर पण इंद्रायणी अद्याप फेसाळलेलीच, वारकरी भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त । Indrayani River Pollution
– ‘साहेब, हा भोंगळ कारभार थांबवा..’ मावळ तालुक्यात विजेचा लपंडाव, युवक काँग्रेसचे महावितरणला निवेदन । Maval News