Dainik Maval News : मावळ तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान राबविण्यात येत असून तालुक्यातील सर्व शाळांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी केले आहे.
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे.
अभियानाच्या तपासणी अहवालामध्ये असणारे सर्व विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व लिपिक यांची सहविचार सभा नुकतीच तळेगाव दाभाडे येथील अॅड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर येथे संपन्न झाली. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूंज, मावळ तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, कार्याध्यक्ष रमेश आरगडे, सचिव विकास तारे, मुख्याध्यापक पांडुरंग पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
डिसेंबर महिन्यामध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण आणि शहरी माध्यमिक शाळा असे दोन महत्त्वाचे गट करण्यात आले आहे. प्रत्येक गटात ५०० पर्यंत विद्यार्थी असलेल्या शाळा, ५०० ते १००० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा व १००० चे वर विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा असे गट राहणार आहेत.
मावळ तालुक्यात माध्यमिक स्तरावर एकूण ८३ शाळा असून त्यातील सर्व शाळांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष विठ्ठल माळशिकरे तसेच पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देवाभाऊ 3.0 : “मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” राज्यात नव्या ‘देवेंद्र’पर्वाचा आरंभ । Maharashtra New CM
– मुख्यमंत्री बनताच देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर, पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
– “मी अजित आशाताई अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की… अजित पवार यांनी विक्रमी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ