श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचातर्फे किल्ले विसापूर वरील शिवमंदिराचा जीर्णोद्धाराच्या निमित्ताने आठवा वर्धापनदिन दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शंभू महादेवाला लघुरुद्राभिषेक करण्यात आला. त्यामुळे गडावरील वातावरण भक्तिमय होऊन गेले होते. यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी गडावर स्वच्छता मोहीम राबविली. प्लास्टिकच्या बाटल्या, कागद इत्यादी तत्सम कचरा गोळा करण्यात आला. विसापूर किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांचे यानिमित्ताने स्वछतेविषयी जागरूकता व प्रबोधन देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, संदीप गाडे तसेच, मंचाचे अध्यक्ष विश्वास दौंडकर, सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, सागर दळवी, बसप्पा भंडारी, चेतन जोशी आदी कार्यकर्त्यांनी केले होते. ( Eighth restoration anniversary of Shiva temple at Visapur Fort in Maval celebrated with enthusiasm )
2016 साली पावसाळ्यात विसापूर किल्ल्यावरील शिवमंदिर पूर्णपणे ढासळले होते. मंचाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भारतीय पुरातत्व विभागामार्फत 2017 साली शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी मंचाकडून हा दिवस जीर्णोद्धार वर्धापन दिन म्हणून साजरा केला जात आहे.
लोहगड विसापूर विकास मंच –
लोहगड विसापूर विकास मंच गेली 25 वर्षे लोहगड व विसापूर किल्ल्यांच्या संवर्धनाचे कार्य करत आहे. लोहगड ग्रामस्थांच्या सहकार्यातून लोहगडवरील शिवमंदिर जीर्णोद्धार व पायथ्याला भव्य शिवस्मारक उभारण्यात आले आहे. नुकतेच भारत सरकारद्वारे लोहगड किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळ्यांच्या यादीत नामांकनासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे, ही बाब मावळवासियांसाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे उर्वरित गडसंवर्धनाची कामे जसे लोहगड पायथ्याशी शिवसृष्टी तसेच, विसापूर किल्ल्यावरील संवर्धनाची कामे ताबडतोब सुरु करण्यात यावी अशी मागणी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी केली.
अधिक वाचा –
– कान्हे-नायगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी चोपडे यांची निवड । Maval News
– शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कुणी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री किंवा बोगस वाण विक्री करत असल्यास ‘इथे’ करा तक्रार
– आनंदवार्ता ! अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर । Maharashtra Sadan In Ayodhya