Dainik Maval News : कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा पालखी सोहळा शुक्रवारी, चैत्र शुद्ध सप्तमीला (दि.4 एप्रिल) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गुढीपाडव्यापासून एकविरा देवीच्या चैत्री यात्रेला सुरुवात झाली होती.
गुरुवारी (दि.3) षष्टीला देवीचे माहेरघर असलेल्या देवघर येथे श्री काळभैरवनाथाचा पालखी सोहळा संपन्न झाला. त्यानंतर शुक्रवारी यात्रेतील महत्वाचा पालखी सोहळ्याचा सप्तमीचा दिवस उजाडला. शुक्रवारी पहाटे देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेश म्हात्रे, अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्या हस्ते सपत्नीक देवीचा अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर गुरव प्रतिनिधी नवनाथ देशमुख यांच्या हस्ते विधीवत देवीचा मुखवटा पालखीत ठेवण्यात आला.
- सायंकाळी पाच वाजता गडावर देवीची महाआरती संपन्न झाली, त्यानंतर पालखीचे विधिवत पुजन होऊन पारंपारिक वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात गडावरून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर देवीच्या भक्तांनी भरून गेला होता. ‘आई मी आयलो’ ‘आई माऊलीचा उदो उदो’ च्या गजरात गड दुमदुमून गेला होता.
पालखी सोहळ्यासाठी अगदी मुंबई, ठाणे, रायगडसह महाराष्ट्रातून लाखो भाविक गडावर आले होते. एकविरा देवी ही कोळी, आग्री बांधवांची कुलदैवता असल्याने कोकण भागातून अनेक पालख्या गडावर दाखल झाल्या होत्या. दरम्यान, पालखी सोहळ्याच्याआधी अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने काहीवेळ भाविकांची तारांबळ उडाली, परंतु सायंकाळी पालखी सोहळा विनाव्यत्य उत्साहात पार पडला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number