Dainik Maval News : श्री एकविरा विद्या मंदिर आणि लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स कार्ला या विद्यालयाचा पहिल्या टप्प्यात मावळ तालुक्यात मुख्यमंत्री – माझी शाळा सुंदर शाळा अभियानात तालुक्यातून द्वितीय क्रमांक आला होता. त्यानंतर आता अभियानाचा दुसरा टप्पा 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत होत असून दुसऱ्या टप्याची सुरूवात वृक्षारोपण करुन करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शाळेच्या प्रांगणात नियोजनपूर्वक आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करुन करण्यात आली. यावेळी प्राचार्य संजय वंजारे, पर्यावरण प्रमूख विवेक भगत, सचिन हुलावळे, शिक्षक प्रतिनिधी संजय हुलावळे, मच्छिंद्र बारवकर, उमेश इंगुळकर, नरेंद्र इंदापुरे, अनिल चौधरी, वैजयंती कुल, अलका आडकर, संगीता खराडे, रंजना नवाळे, काजल गायकवाड, प्रणाली उंबरे, शिल्पा वर्तक, वैजयंता शेवाळे, लिपिक गणेश बोंबले, बाबाजी हुलावळे, रोहिदास वाघवले तसेच विद्यार्थी इतर अध्यापक उपस्थित होते. ( Ekvira Vidya Mandir Karla School started Mazi Shala Sundar Shala campaign with tree plantation )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके आणि सत्यजित तांबे यांच्या हस्ते लोणावळ्यात ‘संकल्प नशा मुक्ती’ अभियान माहिती पत्रकाचे अनावरण । Lonavala News
– चांदखेड येथे अज्ञात भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीचालक तरूणाचा मृत्यू, सहप्रवासी गंभीर । Maval News
– अजित पवारांकडून मावळातील विकासकामांचा आढावा; टाकवे व मळवली पुलांच्या कामाबाबत नाराजी ; लोणावळा, कान्हे रुग्णालये लवकरच जनसेवेत