कार्ला येथील एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी कार्ला येथील दीपक निवृती हुलावळे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी मारूती देशमुख आणि सागर देवकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. खासदार सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांची देवस्थानचे प्रमुख विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली असल्याचे मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी जाहीर केले. सचिव पदी मुख्य पुजारी नवनाथ देशमुख, खजिनदार पदी संजय गोविलकर. सहसचिव पदी महेंद्र देशमुख, सह खजिनदार पदी विकास पडवळ यांची निवड करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
2023 पासून देवस्थान ट्रस्टवरील भाविक पदाच्या दोन सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया चालू होती. शनिवारी दोन सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर गुरूवारी, दि. 11 सर्व विश्वस्तांनी सभा पार पडली. या सभेत दीपक हुलावळे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आमदार सुनिल शेळके यांनी सर्वांची निवड जाहीर करत सर्वांचे अभिनंदन केले. ( Election of Deepak Hulawle as President of Ekvira Devasthan Trust MP Suresh Mhatre as Chief Trustee )
यावेळी मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, वेहरगाव सरपंच व देवस्थानच्या विश्वस्त वर्षा मावकर, नंदकुमार पदमुले, संतोष मावकर, तानाजी पडवळ, संदीप आंद्रे, शहाजी पडवळ, संतोष राऊत, शांताराम मावकर, पांडुरंग मावकर, भरत येवले, सुभाष हुलावळे, अमोल हुलावळे, राजु हुलावळे, सुरेश कडू, बाळासाहेब गुंड, प्रशांत हुलावळे, सनी हुलावळे, संतोष हुलावळे, गणेश देशमुख आदींनी निवनिर्वाचीत अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
गडावर येणाऱ्या भाविकांच्या अडचणी लक्षात घेता प्रथमतः गडावरील प्राथमिक सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी सांगितले. तर राज्यातून व केंद्रातून देवस्थानासाठी आमदार सुनिल आण्णा शेळकेंसोबत मीही प्रयत्न करून देवस्थानाची ख्याती देशभर करू आणि एकविरा गड व परिसराचा विकास करू असे खासदार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे येथे शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा ; पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मार्गदर्शन
– उंदीर पकडायच्या जाळीत अडकले नागोबा, सर्पमित्रांंकडून जीवदान
– वडगाव शहरासाठी स्वतंत्र फिडरमधून वीजपुरवठा करण्याची मागणी ; तालुक्याच्या राजधानीतील विजेचा लपंडाव थांबवावा