Dainik Maval News : शिवली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदाची निवड प्रक्रिया मंगळवारी (दि.८) वडगाव येथे पार पडली. यावेळी चेअरमनपदी माजी सरपंच रमेश आडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
भिकु लोहर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी विशेष सभा बोलाविण्यात आली. यावेळी विहित मुदतेत रमेश आडकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी त्यांची अविरोध निवड जाहीर केली.
यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, किसन कदम, शरद घारे, दत्तू आडकर, गुलाबराव आडकर, तुकाराम आडकर, भाऊराव आडकर, विलास येवले, पोपटराव आडकर, वसंतराव सोनवणे, चंद्रकांत येवले, धोंडिबा आडकर, सुरेश आडकर उपस्थित होते. निवडीनंतर बोलताना, शेतकर्यांना वेळेत कर्जपुरवठा करणे व शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर काम करणार असल्याचे रमेश आडकर यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंदर मावळातील बेलज – राजपुरी रस्त्याची प्रचंड दुरावस्था ! पर्यटन व्यवसायावर होतोय परिणाम । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’
– मावळवासियांना मोठा दिलासा ! वडगाव येथे कायमस्वरुपी उपविभागीय कार्यालय सुरु होणार । Maval News