Dainik Maval News : कोल्हापूरमधून दुचाकी चोरून मुंबईकडे निघालेल्या चोरट्याला राजारामपुरी पोलिसांनी तळेगाव-दाभाडे परिसरातच सापळा रचून पकडले आहे. अफझल अनीस खान (वय 30, रा. भिवंडी, ठाणे) असे संशयिताचे नाव आहे. शास्त्रीनगर (कोल्हापूर) येथील हॉस्पिटलसमोरील दुचाकी चोरून तो मुंबईच्या दिशेने जात असताना पोलिसांनी वाटेतच त्याला पकडले.
फिर्यादी आवेज अत्तार (वय 22, रा. शिवाजीनगर, बेळगाव) हे नऊ जानेवारीला कोल्हापूर येथे नातेवाइकांकडे आले होते. दुपारी तीनच्या सुमारास ते बाहेर आले असता दुचाकी नजरेस पडली नाही. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी न दिसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
त्यावेळी संशयिताची माहिती व लोकेशन मिळाल्याने तातडीने पथक रवाना करण्यात आले होते. तळेगाव दाभाडे (ता. मावळ) परिसरात सापळा रचून संशयिताला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत सहायक फौजदार समीर शेख, संदीप सावंत, विशाळ शिरगांवकर, अमोल पाटील, नितीश बागडी आदींनी सहभाग घेतला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंदर मावळातील बेलज – राजपुरी रस्त्याची प्रचंड दुरावस्था ! पर्यटन व्यवसायावर होतोय परिणाम । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’
– मावळवासियांना मोठा दिलासा ! वडगाव येथे कायमस्वरुपी उपविभागीय कार्यालय सुरु होणार । Maval News