आंदर मावळ भागातील अनेक गावात मागील तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. माऊ भागात तर अवकाळी पाऊस पडलेल्या दिवसापासून दीड दिवस वीज गायब होती. त्यानंतर आता वीज परतली आहे, परंतू विजेचा लपंडाव सुरु झालाय. त्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वीज येणे जाणे याबद्दल महावितरण किंवा वीज पुरवठा अधिकारी शेकडो कारणे सांगू शकतात, किंवा सांगतात देखील. परंतू विजेच्या सततच्या लपंडावाने गरीब शेतकऱ्यांच्या घरात असल्या नसलेल्या विज उपकरणांची हानी मात्र होते. मागील तीन दिवसांपासून अनेकदा परिसरात किंबहूना आंदर मावळातील अनेक गावात तासंतास वीज गायब होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. ( Electricity is coming and going in Maval Mau village area )
विज नसण्याची किंवा न येण्याची कारणे अनेक असू शकतात. त्यातही अवकाळी पावसामुळे विज वाहक तारा आणि पोल यांचे झालेले नुकसान हे प्रमुख कारण आहे. परंतू एका पावसामुळे तीन दिवस विजेची ही अवस्था होत असेल, तर पावसाळ्यात काय हाल होतील, याची कल्पना न केलेली बरी. तसेच विज गायब होत असेल तर त्याची पुर्वकल्पना ग्राहकांना दिली जात नाही, त्यामुळे विज ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
“ग्राहकांना पूर्वकल्पना न देता तासनतास वीजपुरवठा खंडित केला जातो. ग्राहक सेवा क्रमांकावर फक्त तक्रार नोंदवता येते. तेथून फक्त तक्रार क्रमांक मिळतो. वीज कधी येईल अथवा काय प्रॉब्लेम झालाय हे कळत नाही. सामान्य वीज ग्राहकांनी याबाबतची माहिती कुठून मिळवावी. टोल फ्री नंबर वर कोणी प्रतिनिधी बोलायला येत नाही, हा माझा तीन दिवसातील अनुभव आहे.” (स्थानिक नागरिक)
अधिक वाचा –
– सीबीएसई बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर, वडगावमधील ‘रिषिका बाफना’ पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथम । Vadgaon Maval
– सीबीएसई बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर, वडगावमधील ‘रिषिका बाफना’ पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथम । Vadgaon Maval
– पुणे रिंगरोड बाबत महत्वाची बातमी ! ‘या’ गावातील निवाडे जाहीर, शेतकऱ्यांना लागली लॉटरी, वाचा सविस्तर । Pune Ring Rode News