Dainik Maval News : अधिक क्षमतेचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, विद्युत खांब बसविणे, कर्मचारी संख्या वाढविणे यासारख्या उपाययोजना तातडीने करण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. ही कामे पूर्ण झाल्यावर आंदर मावळ भागातील वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण देखील कमी होईल, अशी आशा आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आंदर मावळ भागात मागील काही दिवसांपासून अनियमित वीजपुरवठा होत असून विजेच्या समस्यांमुळे ग्रामस्थ व शेतकरी त्रस्त आहेत. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार आमदार सुनिल शेळके यांनी (गुरुवारी) आंदर मावळातील गावांमध्ये वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत जाऊन स्थानिकांकडून समस्या जाणून घेतल्या.
यावेळी आमदार शेळके यांच्या बरोबर राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके, वडगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शैलेश गीते, एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिपक हुलावळे, आंदर मावळमधील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
विजेच्या लंपडावामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना देखील आर्थिक फटका बसत आहे. वीज कंपन्यांची देखभाली बाबतची अनास्था यामुळे पावसाळ्यात विद्युत अपघातांचे प्रमाण देखील वाढते. या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रत्येक गावात जाऊन पाहणी केली. या समस्यांवर काय उपाययोजना करता येतील याची माहिती देखील यावेळी घेण्यात आली. त्यानुसार तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
अधिक वाचा –
– पिंपरीत शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी ‘भव्य विजयी संकल्प मेळावा’, अजित पवारांच्या पक्षाला खिंडार पाडल्यानंतर पहिलीच सभा
– मावळचे आजी-माजी आमदार पुन्हा एकत्र, लोकसभा निवडणूकीनंतर सुनिल शेळके आणि बाळा भेगडे ‘या’ कारणासाठी एका मंचावर
– ‘वडगावच्या विकासासाठी आतापर्यंत 65 कोटींचा निधी दिला, यापुढेही उर्वरित कामांसाठी निधी देणार’ – आमदार सुनिल शेळके