मावळ तालुका युवक काँग्रेसच्या माध्यमातून मावळ तालुक्यात महावितरणचा होत असललेला भोंगळ कारभार आणि विजेचा सतत होणारा लपंडाव याबद्दल अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मावळ तालुक्यात अद्याप जोरदार पावसाला सुरूवात झालेली नाही, असे असतानाही ग्रामीण भागात अगदी शहरातील काही भागातही सतत विज ये-जा करत असते. त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत युवक काँग्रेसने बुधवारी (दि. 26 जून) महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
“गेले अनेक दिवस विजेच्या लपंडावामुळे नागरिकांना शेतीच्या, पिण्याच्या पाण्याच्या कामाच्या समस्या भेडसावत आहेत. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी डीपींना बॉक्स सुस्थितीत नाही. अनेक धोकादायक वायर खाली आलेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या जनावरांसोबत दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. स्थानिक महावितरण कार्यालयात ग्रामस्थांच्या तक्रारी अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. अनेक भागात सतत विज पुरवठा खंडित होत आहे. घरोघरी वीज बिल वेळेवर पोहोचत नाही. त्यात बिल अवाढव्य येत आहे. अशा एक ना अनेक नागरिकांच्या समस्या अडचणी लक्षात घेऊन त्वरित सोडवाव्यात,” असे पत्र युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश वाघोले यांनी महावितरणचे अधिकारी यांना दिले आहे.
यावेळी गणेश काजळे, विशाल वाळुंज, किरण मोकाशी, अक्षय जाधव, मलिक शेख, गफूर शेख, पवन गायकवाड, निनाद हरपुडे, रोहित नरवडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ( Electricity shortage in Maval taluka statement of Youth Congress to Mahavitran )
अधिक वाचा –
– संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील 278 लाभार्थ्यांना लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप । Vadgaon Maval
– दहा हजाराची लाच स्विकारताना तलाठी भाऊसाहेब रंगेहात अटक ! मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना
– आमदारसाहेब..! मावळ तालुक्यातील जलजीवन मिशनची अपूरी कामे आणि रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचारावर अधिवेशनात आवाज उठवा