व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, February 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हुश्श..! अखेर लाईट आली, मुळशी तालुक्यातील 45 गावांचा वीज पुरवठा सुरळीत, महापारेषण आणि महावितरणचे शर्थीचे प्रयत्न

टप्प्याटप्प्याने भुकूम, भूगाव, पिरंगुट, कोळवण खोरे, मुठा खोरे आदी मुळशी तालुक्यातील परिसरातील ४५ गावांतील सुमारे ६५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 16, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Dainik-Maval-Impact-Mahavitaran

Photo - Dainik Maval Graphics Team


पुणे (१६ एप्रिल २०२४) : महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही टॉवर लाइनची दोनपैकी एक वीजवाहिनी तुटल्याने पिरंगुट २२० केव्ही व हिंजवडी २२० केव्ही उपकेंद्रांचा व पर्यायाने महावितरणच्या २० वाहिन्यांचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. १६) सकाळी ९.१० वाजता बंद पडला होता. मात्र युद्धपातळीवर पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करून दुपारी १२.०५ ते ३.३६ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने भुकूम, भूगाव, पिरंगुट, कोळवण खोरे, मुठा खोरे आदी मुळशी तालुक्यातील परिसरातील ४५ गावांतील सुमारे ६५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

याबाबत माहिती अशी की, कोकणातील रोहा येथून महापारेषणच्या कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून टॉवर लाइनद्वारे पिंरगुट व हिंजवडी येथील महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र कांदळगाव २२० केव्ही टॉवर लाइनची एक वीजवाहिनी आंबेगाव (ता. मुळशी) येथे मंगळवारी (दि. १६) सकाळी ९.१० वाजताच्या सुमारास तुटली. त्यामुळे पिरंगुट व हिंजवडी अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. तर या उपकेंद्रांवर अवलंबून असलेले महावितरणच्या सुमारे २० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला. यात ७० मेगावॅट विजेची पारषेण तूट निर्माण झाली. त्यामुळे मुळशी तालुक्यातील भूगाव, भूकूम पिरंगूट, बुरावडे, कोळवण खोरे, मुठा खोरे, पौड, माले, माण, मारूंजी, कासारसाई, नेरे, दत्तवाडी, हिंजवडीचा काही भागासह ४५ गावांतील सुमारे ६५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. ( Electricity supply to 45 villages in Mulshi taluka is smooth Combined work of Mahapareshan and Mahavitaran )

सध्या तापलेल्या उन्हामुळे विजेची मागणी वाढल्याने ७० मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करणे आव्हानात्मक होते. मात्र महापारेषण व महावितरणने संयुक्तपणे युद्धपातळीवर प्रयत्न करून खंडित झालेल्या भागात दुपारी १२.०५ मिनिटांनी पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात सुरवात केली. दुपारी ३.३६ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वच ४५ गावांतील ६५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. दरम्यान महापारेषणकडून तुटलेल्या अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या दुरूस्ती कामाला वेग देण्यात आला. यात आज दुपारी ३.२५ वाजता तुटलेल्या वीजवाहिनीचे दुरुस्ती काम पूर्ण झाले. त्यानंतर महापारेषणची कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली व त्याद्वारे पिंरगुट व हिंजवडी येथील महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राचा वीजपुरवठा देखील पूर्ववत झाला.

अधिक वाचा –
– मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी तळेगाव दाभाडे येथील किरण मोकाशी यांची नियुक्ती । Talegaon Dabhade
– संयुक्त पत्रकार परिषदेनंतर मावळ विधानसभेत आज महायुतीचा मेळावा; पदाधिकारी-कार्यकर्त्यांना समजणार प्रचाराची दिशा
– मोठी बातमी! महापारेषणची टॉवर लाईनची वीजवाहिनी तुटली, 45 गावांतील सुमारे 65 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित । Pune News


Previous Post

दुःखद ! देहूरोड पोलिस ठाणे येथे कर्तव्यावर जात असलेल्या पोलिस हवालदाराचा दुचाकी अपघातात मृत्यू । Dehu Road News

Next Post

IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून सिंहगड इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांना ‘संकल्प नशामुक्तीचा’ डोस, विद्यार्थ्यांवर राहणार ‘करडी’ नजर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
IPS Satyasai Karthik

IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून सिंहगड इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांना 'संकल्प नशामुक्तीचा' डोस, विद्यार्थ्यांवर राहणार 'करडी' नजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.