व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून सिंहगड इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांना ‘संकल्प नशामुक्तीचा’ डोस, विद्यार्थ्यांवर राहणार ‘करडी’ नजर

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदशनाखाली आणि लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून 'संकल्प नशामुक्ती' हे अभियान राबविण्यात येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 16, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
IPS Satyasai Karthik

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदशनाखाली आणि लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून ‘संकल्प नशामुक्ती’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मंगळवारी, दिनांक 16 एप्रिल रोजी सिंहगड इन्स्टिट्युट, कुसगाव बु. (लोणावळा) या संस्थेतील एकूण 8 विविध विभागाचे कॉलेजमधील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कोऑर्डीनेटर, एनएसएस, एनसीसी आणि इतर सर्व विद्यार्थी यांच्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक ( लोणावळा विभाग) यांनी कार्यशाळा घेऊन सहभागी सर्व विद्यार्थी आणि अध्यापकांना मार्गदर्शन केले. तसेच कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेले नशेबाबत विद्यार्थी आणि कॉलेज प्रशासनाला योग्य त्या सुचना केल्या. महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थ्यांना केलेल्या सुचना खालील प्रमाणे;

1) कॉलेजमधील जे विद्यार्थी दारू, गांजा, चरस, एमडी पावडर अशा विविध प्रकारचे नशेच्या आहारी गेलेले आहेत त्यांची माहिती संकलित करणे.
2) कॉलेजमध्ये अशा प्रकारची कोणी नशा करत असल्यास अथवा अशी अमली पदार्थाची विकी करत असल्याची माहिती असल्यास त्याबाबत आम्हाला (पोलिस) वैयक्तिक माहिती कळविण्याबाबत आवाहन केले.
3) कॉलेजमध्ये समुपदेशन कक्ष (काऊसिंलीग सेल) स्थापन करून त्यामध्ये प्रत्येक कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक, हॉस्टेलचे रेक्टर, पोलीस असे प्रतिनिधी यांची नेमणुक करणे.
4) नशा करणाऱ्या विध्यार्थ्यांना संकल्प नशामुक्‍ती अभियानांतर्गत अशा समुपदेशन कक्षामध्ये आणुन त्यांचे त्याठिकाणी समुपदेशन (काऊसिलींग) करणे, नशा करणारे विद्यार्थी यांच्या पालकांना बोलावून त्यांच्या कडून मार्गदर्शन करणे.
5) कॉलेजचे मुख्य प्रवेशव्दार, हॉस्टेलचे प्रवेशद्वार आणि एक्झीट गेटवर तपासणी करणे

6) कॉलेज प्रशासनाच्या माध्यमातून विद्यार्थी वास्तव्याचे ठिकाणी अचानकपणे भेटी देऊन अशा दारू, गांजा, चरस, एमडी इत्यादी प्रकारची नशा कोण करत आहे का, याची चेकींग केली जाईल.
7) कॉलेज लगत असलेली पोलीस चौकी सक्रीय करून त्याठिकाणचे पोलीस स्टाफच्या मदतीने कॉलेज कॅम्पस व हॉस्टेल परीसरात पेट्रोलींग करण्यात येईल. कॉलेजमधील विद्यार्थी यांच्यावर कॉलेज प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे मार्फतीने विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
8) कॉलेजमधील विद्यार्थी यांना नशा पुरवणारे डिलर यांची माहिती संकलीत करून त्यांच्यावर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

वरीलप्रमाणे विविध विषयांवर मार्गदर्शन करून कॉलेजमधील तरूण मुले-मुलांमध्ये वाढत चाललेली विविध प्रकारची नशा रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने संकल्प नशा मुक्‍ती अभियान सुरू केलेले आहे. आतापर्यंत या अभियानामाफत विविध कार्यकम राबविण्यात आलेले आहेत, अशी माहिती आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली. ( Guidance from Pune Rural Police IPS Satyasai Karthik to students of Sinhagad Institute about de-addiction )

अधिक वाचा –
– दुःखद ! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने संपवले जीवन, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना, लग्न मंडपात शोककळा । Talegaon Dabhade
– मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी तळेगाव दाभाडे येथील किरण मोकाशी यांची नियुक्ती । Talegaon Dabhade
– संयुक्त पत्रकार परिषदेनंतर मावळ विधानसभेत आज महायुतीचा मेळावा; पदाधिकारी-कार्यकर्त्यांना समजणार प्रचाराची दिशा


dainik maval jahirat

Previous Post

हुश्श..! अखेर लाईट आली, मुळशी तालुक्यातील 45 गावांचा वीज पुरवठा सुरळीत, महापारेषण आणि महावितरणचे शर्थीचे प्रयत्न

Next Post

यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर! आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, समीर खोडे महाराष्ट्रातून प्रथम । UPSC 2023 Result

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
UPSC CSE Final Result 2023

यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर! आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, समीर खोडे महाराष्ट्रातून प्रथम । UPSC 2023 Result

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.