तृतीयपंथीयांच्या पोलिस भरतीचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. केवळ धोरण नाही म्हणून महाराष्ट्र पोलीस भरती त तृतीयपंथीयांना डावलणे अयोग्य असल्याचे मत मुंबई हायकोर्टाने व्यक्त केले आहे. ( Employment Opportunities Can Not Be Denied To Transgenders High Court Reprimanded State Government On Police Bharti 2022 )
पोलीस हवालदारपदासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करण्यात अपयशी ठरल्याबद्दल उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला फटकारले. सरकारकडे धोरण नाही, म्हणून तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलू शकत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला सुनावले. गृह विभागाच्या अंतर्गंत येणाऱ्या सर्व भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठीही (ट्रान्सजेंडर) पर्याय ठेवणे अनिवार्य करण्याच्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) आदेशाशी प्रथमदर्शनी सहमत आहोत, असे स्पष्ट मत हायकोर्टाने व्यक्त केले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्य गृह विभागाच्या सर्व भरती प्रक्रियांमध्ये स्त्री-पुरुषांप्रमाणे तृतीयपंथीयांसाठीही पर्याय ठेवण्याचा आदेश मॅटने दिला होता. भरती प्रक्रियेतील तृतीयपंथीयांच्या श्रेणीसाठी शारीरिक चाचणीसाठीचे निकषही निश्चित करण्याचे आदेश मॅटच्या अध्यक्ष मृदुला भाटकर यांनी गृह विभागाला दिले होते. मात्र या निर्णयाला राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू आहे. ( Employment Opportunities Can Not Be Denied To Transgenders High Court Reprimanded State Government On Police Bharti 2022 )
प्रकरण काय?
पोलिस हवालदार पदाचा ऑनलाईन अर्ज भरताना अर्जात पुरुष आणि स्त्री असे दोनच पर्याय उपलब्ध असल्याने तृतीयपंथीय अर्जदार आर्य पुजारी दोन्हीपैकी कोणताही पर्याय निवडू शकला नाही. परिणामी त्याचा अर्ज स्विकारला गेला नाही. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध नसल्याविरोधात आर्यने मॅटकडे याचिका दाखल केली होती. ज्यात त्याची बाजू ग्राह्य धरत गृह विभागाच्या सर्व भरती प्रक्रियेमध्ये यापुढे स्त्री-पुरूषांप्रमाणे तृतीयपंथीयांसाठीही स्वतंत्र पर्याय ठेवण्याचे आदेश तसेच ऑनलाइन अर्जांची पडताळणी करण्याच्या दृष्टीने निकष निश्चित करण्याचे आदेश मॅटने दिले आहेत.
अधिक वाचा –
– खळबळजनक! मावळ तालुक्यात महिला सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक
– तळेगाव दाभाडे शहर भाजपाकडून पक्ष कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन । Mahaparinirvan Diwas 2022