Dainik Maval News : पूर्वीच्या काळात गुरुकुल आश्रम असायचे. आपण अनेक ग्रंथामध्ये असे ऐकतो की, भगवान प्रभू श्रीराम हे गुरु वसिष्ट तर भगवान श्रीकृष्ण हे संदीपानी यांचेकडे शिकले होते. आजच्या आधुनिक युगात मात्र मुलांना शिक्षणासोबत चांगले संस्कार अथवा अध्यात्मिक संस्कार मिळत नाहीत. त्यामुळे मावळ तालुक्यात प्रथमच अध्यात्मिक गुरुकुल संस्कार वर्गाची सुरूवात करण्यात आली आहे. रविवारी, दिनांक 11 ऑगस्ट रोजी साईबाबा सेवाधाम कान्हे येथे मावळ तालुक्यातील प्रथम ‘गुरुकुल’ संस्कार वर्गाची स्थापना करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पंडित किरण परळीकर, संतोष कुंभार, अभिमन्यू शिंदे, हभप बाळासाहेब महाराज जांभुळकर यांच्या उपस्थितीत गुरुकुलाची स्थापना करण्यात आली. या संस्कार वर्गात प्रत्येक रविवारी सकाळी आठ ते दुपारी बारा पर्यंत संस्कृतपाठ, अध्यात्मिक पाठ, संत साहित्य, मृदंग, प्रवचन, कीर्तन श्रीमद् भगवद्गीता विविध संतांचे चरित्र आणि स्तोत्र विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहेत. ( Establishment of Gurukul Sanskar Class at Saibaba Sevadham Kanhe Maval )
उद्गाटनावेळी अनेक मान्यवरांनी मनोगतमध्ये गुरुकुल वर्गाला शुभेच्छा दिल्या. तसेच गुरुकुल संस्कार वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या गुरुकुलमध्ये शिक्षक वृंद किरण परळीकर, दत्तात्रय महाराज हजारे, गोपीचंद महाराज कचरे, किसन महाराज केदारी, सहाय्यक गणेश महाराज जांभळे, लक्ष्मण भाऊ सातकर असणार आहेत. गुरुकुलात विद्यार्थ्यांना नाममात्र फी घेतली जाणार आहे. गुरुकुल स्थापनेच्या पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली.
यावेळी शांताराम जगताप, आनंद नवघणे, दत्ता महाराज शिंदे, सागर भुंडे, चांदगुडे साहेब, काळुराम आंद्रे, प्रतीक म्हाळसकर, राजाराम असवले, दत्ता महाराज केदारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हभप मोगरवाडीकर यांनी कार्याला आशीर्वाद व्यक्त केले. हभप दत्ता महाराज हजारे यांनी प्रास्ताविक, तर हभप गणेश महाराज जांभळे यांनी सूत्रसंचालन. नियोजन हभप किसन महाराज केदारी आणि हभप गोपीचंद महाराज कचरे यांनी केले.
अधिक वाचा –
– मतदार यादीत आपले नाव आहे की नाही ? एकदा खात्री कराच, एका क्लिकवर होईल काम
– रोटरी क्लबकडून मावळातील ब्राम्हणोली गाव दत्तक, समाजसभेची स्थापना, गावात राबवणार विविध समाजोपयोगी उपक्रम
– वडगाव शहरातील नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे, नगरपंचायत प्रशासनाचे आवाहन । Vadgaon Maval