व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रोटरी क्लबकडून मावळातील ब्राम्हणोली गाव दत्तक, समाजसभेची स्थापना, गावात राबवणार विविध समाजोपयोगी उपक्रम

रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड यांनी मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागातील ब्राम्हणोली गाव दत्तक घेतले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 12, 2024
in ग्रामीण, लोकल, शहर
Bramhanoli village of Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड यांनी मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागातील ब्राम्हणोली गाव दत्तक घेतले आहे. सदर सामाजिक संस्थेच्या मदतीने गावात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामस्थांच्या पुढाकारने व रोटरीच्या नियमाने याकरिता समाजसभेची स्थापना करण्यात आली आहे. तसेच रोटरी इंटरनॅशनलच्या मान्यतेचे बाम्हणोली गावाला आर. सी. सी. प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

गावाच्या शैक्षणिक, आरोग्य, महिला सबलीकरण, शुध्द पाणी इ. विषयीच्या गरजांची मांडणी गावाच्या वतीने समाजसभा कमिटीच्या मार्फत करण्यात आली. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष अभय देवरे,श्रीकांत पाटणकर, मिलिंद बिवलकर, विजय पुराणिक रमाकांत जाधव, अमेय पासलकर, सतिश कुलकर्णी, अभय मायदेवहे रोटरी क्लब चे कमिटी सदस्य उपस्थित होते. ( Rotary Club of Pune Sinhagad Road adopted Bramhanoli village of Maval taluka )

यावेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष अभय देवरे म्हणाले की, गावतील शैक्षणिक व आरोग्य सुविधा पुरवण्यावर भर दिला जाईल त्यासाठी गावाचे योगदान देखील महत्वाचे आहे. आर. सी. सी. व रोटरी क्लब यांच्या कार्यपद्धती व नियम याबाबत मार्गदर्शन केले. यांनी ग्रामस्थ व आर. सी.सी कमिटी सदस्यांची भूमिका, कर्तव्ये, श्रमदान, आर्थिक सहभाग इ. बाबत सविस्तर माहिती दिली. रोटरी क्लब बरोबर असलेली सहयोगी संस्था – शिव विद्या प्रतिष्ठान यांचे प्रमुख शिल्पा कशेळकर व संतोष वंजारी यांनी गाव विकासासाठी सर्वांनी एकीने पुढे यावे तसेच युवक व महिलांनी नेतृत्व घ्यावे असे सांगितले.

यावेळी समाजसभा कमिटी अध्यक्ष योगेश काळे, सचिव अंकुश काळे, सुनिल काळे, शंकर काळे, महिला प्रतिनिधी कविता काळे, माजी सरपंच मारूती काळे, विद्यमान उपसरपंच बाळासाहेब काळे, शहाजी काळे, निवृत्ती काळे, माजी चेअरमन गणपत काळे, माजी चेअरमन मधुकर काळे, लक्ष्मण काळे, ग्रा.पं. कर्मचारी माऊली काळे, जि.प. शाळा मुख्याध्यापक संजय ठाकर,माजी उपसरपंच नवनाथ काळे, अनंता ताकदुंदे, पोलिस पाटील तानाजी काळे, भाऊ दळवी, तुकाराम काळे, ज्ञानेश्वर पवार, तसेच गावातील सर्व पदाधिकारी, युवक, महिला बचतगट सदस्य, रोटरी प्रकल्प लाभार्थीं व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात रोटरीच्या सहकार्याने व लोकसहभागातून गाव विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचा संकल्प केला.

अधिक वाचा –
– टाकवे बुद्रूक येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात, क्रांतिकारकांच्या स्मारकासाठी 1 कोटी निधी देण्याची आमदार शेळकेंची घोषणा
– तळेगावात भाजपाची गांधीगिरी, रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी आघाडीचे स्वखर्चाने बुजविले मुख्य मार्गावरील खड्डे
– राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा शुक्रवारी मावळात येणार, अजित पवार साधणार लाडक्या बहिणींशी संवाद, वाचा अधिक


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहरातील नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे, नगरपंचायत प्रशासनाचे आवाहन । Vadgaon Maval

Next Post

मतदार यादीत आपले नाव आहे की नाही ? एकदा खात्री कराच, एका क्लिकवर होईल काम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
New-Voter-Registration

मतदार यादीत आपले नाव आहे की नाही ? एकदा खात्री कराच, एका क्लिकवर होईल काम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.