महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून वडगाव मावळ इथे राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष तुषार वहिले यांनी (श्रमिक) बांधकाम मजुरांसाठी कामगार कट्टा उपलब्ध करुन दिला. यावेळी वडगावचे प्रथम नगराध्यक्ष मयुर ढोरे, तसेच नवनिर्वाचित कृषीउत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाषराव जाधव यांच्या हस्ते संघटनेचे उद्घाटन करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष तुषार वहिले यांनी सांगितले की, ‘वडगावमध्ये अनेक बांधकाम मजूर असून यामध्ये गवंडी, बिगारी, प्लंबर, पेंटर, इलेक्ट्रीशन, फरशी बसवणारा, पीओपी वाला, सुतारकाम, इतर पुरुष आणि महिला मजूर अधिक प्रमाणात वास्तव्यास आहे. परंतु त्यांना मिळणाऱ्या मुलभूत हक्कापासून ते वंचित आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व कामगार एकाच छताखाली घेऊन शासनाकडून मिळणाऱ्या सर्व सेवांचा लाभ व्हावा यासाठी एकत्र केले. त्यामुळे येणाऱ्या काळात या कामगारांसाठी “महाराष्ट्र कामगार व इतर बांधकाम कल्याणकारी” योजने अंतर्गत लाभ मिळून देऊन गाव पातळीवर त्यांना आरोग्य शिबिर, त्याच्या मुलांना शैक्षणिक उपक्रम, तसेच इतर अनेक उपक्रम राबवणार आहे,’ असे वहिले यांनी सांगितले.
प्रथम नगराध्यक्ष मयुर ढोरे व नगरसेविका पूजा वहिले यांनी यावेळी बोलताना, कामगारांसाठी सुशोभित कट्टा उभारण्याचे आश्वासन दिले. तसेच कृषी उत्पन्न बाजारसमिती संचालक सुभाषराव जाधव यांनीही कामगारांना मार्गदर्शन केले. ( establishment of labor union at vadgaon maval on occasion of labor day along with 1st may maharashtra day )
माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, माजी उपसरपंच विशाल वहिले, जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, अफताब सय्यद, शिंदेमामा, राष्ट्रीय खेळाडू शैलेश वहिले, सचिन ढोरे, अॅड अजित वहिले, बांधकाम व्यायवसायिक सिद्धेश ढोरे, शैलेश खैरे, स्वप्निल वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते. सर्व उपस्थित कामगाराना गुलाबपुष्प व अल्पोपहार देण्यात आला. सर्व मानवरांचे राष्ट्रवादी कामगारसेल अध्यक्ष तुषार वहिले यांनी आभार मानले. उपस्थित कामगार यांनी समाधान व्यक्त केले.
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायत आवारात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा । Maharashtra Din 2023
– मोरवे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र दिनानिमित्त स्वच्छता मोहिम
– वडगावात ‘मल्हार’ कुटुंबीयांकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा । Maharashtra Din 2023