वडगाव मावळ शहरातील श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिराच्या 29 व्या वर्धापनदिनानिमित्त बालविकास मित्र मंडळाच्या वतीने सोमवारी (दि. 20 नोव्हेंबर) गणेशयाग महोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी सकाळी सात वाजता अभिषेक, आठ वाजता होमहवन व महापूजा, दुपारी बारा वाजता ‘श्रीं’ची महाआरती, दुपारी एक वाजता भजन, दुपारी साडेचार वाजता मिरवणूक व सायंकाळी सात वाजता राजमाचीकर मैदानात युवा कीर्तनकार अक्षय महाराज पिंगळे यांचे कीर्तन होईल. आळंदीतील श्री. संत नगद नारायण महाराज वारकरी शिक्षण संस्था व गुरुबंधू आळंदीकर यांची कीर्तनसाथ असेल. मंडळाचे अध्यक्ष अतुल राऊत यांनी हि माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
असं आहे कार्यक्रमाचे नियोजन –
श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर – बालविकास मित्र मंडळ – गणेशयाग महोत्सव, वडगाव मावळ
२९ वा वर्धापन दिन – सोमवार दि. २० नोव्हेंबर २०२३
कार्यक्रम रूपरेषा
सकाळी ७ वाजता – श्रींचा अभिषेक
सकाळी ८ वाजता – होमहवन व सत्यनारायण महापुजा
दुपारी १२ वाजता – श्रींची महाआरती
दुपारी १ वाजता – भजनाचा कार्यक्रम
दुपारी ४.३० वाजता – श्रींची मिरवणूक – टाळकरी विद्यार्थी सहभाग, आळंदी
सायंकाळी ७ वाजता –
विनोदाचार्य, युवा किर्तनकार ह.भ.प. अक्षय महाराज पिंगळे (महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार)
कीर्तनसाथ – श्री संत नगद नारायण महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची तसेच गुरुबंधू आळंदीकर
( events in Vadgaon Maval on occasion of Chinchecha Chintamani Ganapati Temple anniversary )
अधिक वाचा –
– सोमाटणे गावात 50 लाख निधीतून होणाऱ्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न
– ‘…अन्यथा शासनाला गावकारभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल’, गावखेड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची सरपंच परिषदेची मागणी
– मोठी बातमी! टायगर पॉईंट इथे मध्यरात्रीपर्यंत दुकाने सुरु ठेवणाऱ्या टपरी चालकांवर लोणावळा पोलिसांची कारवाई