राज्यातील तब्बल 7751 जाहीर झालेलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांकरिता आज (रविवार, 18 डिसेंबर) रोजी ठिकठिकाणी मतदान पार पडत आहे. अशात बीड जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ग्रामपंचायत सरपंच पदाच्या उमेदवाराच्या नावासमोर असलेले बटन फेविस्टिकसारखा चिकटणारा गोंद टाकून बंद केल्याचा धक्कादायक प्रकार बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे घडला आहे. याबाबत तक्रार झाल्यानंतर सदर मतदान मशीन बदलण्यात आले. मात्र, या प्रक्रियेत काहीकाळ मतदान थांबवण्यात आले होते, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे 2 नंबरच्या बुथवर ईव्हीएम मशीनमध्ये गणेश वाणी यांच्या नावासमोर असलेल्या बटनावर स्टिकफास्ट टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत उमेदवार वाणी यांनी तक्रार केल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी खात्री केली आणि सदरील ईव्हीएम मशीन बदलण्यात आली. ( EVM Machine Button Stopped By Favistick Gram Panchayat Election Beed District Maharashtra )
अधिक वाचा –
– मुंढावरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारती थोरवे बिनविरोध
– सरपंचपदाच्या उमेदवार महिलेच्या पतीचा प्रचारादरम्यान मृत्यू; गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतंय कौतूक