मावळ तालुक्यात जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून अनेक गावातील पाण्याचे प्रश्न मार्गी लागले आहेत. नुकतेच तब्बल 4 कोटी 36 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालेल्या गहुंजे नळ पाणीपुरवठा योजनेचा ( Gahunje Tap Water Supply Scheme ) भुमीपूजन समारंभ ( Bhumi Pujan Ceremony ) संपन्न झाला. मात्र, या विकासकामाचे भुमीपूजन होत असताना तालुक्यात एक वेगळीच चर्चा होत आहे.
रविवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी मावळ तालुक्याचे माजी आमदार ( Ex MLA ) आणि राज्याचे माजी राज्यमंत्री ( Minister of State ) संजय उर्फ बाळा भेगडे ( Bala Bhegde ) यांच्या हस्ते गहुंजे पाणीपुरवठा योजनेचा भुमीपूजन समारंभ पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून ‘हर घर नल, हर घर जल’ अभियान राबवण्यात येत आहे. त्यानुसार गहुंजे गावात 4 कोटी 36 लाख रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे.
या विकासकामाचे भूमिपूजन बाळा भेगडे आणि गहुंजे ग्रामपंचायत सरपंच कुलदीप गोविंद बोडके तसेच सन्मानीय ग्रामपंचायत सदस्य, यांसह इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थित रविवारी संपन्न झाले. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू झालेल्या या योजनेमुळे गहुंजे आणि परिसरातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
योजनेच्या श्रेयावरुन तालुक्यात वेगळीच चर्चा;
भाजपातून राष्ट्रवादीत आलेले सुनिल शेळके ( Sunil Shelke ) हे तालुक्याचे आमदार झाले. त्यानंतर तालुक्यातील भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. सुनिल शेळके यांनी आमदार म्हणून आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मावळ तालुक्यातील अनेक गावांसाठी जलजीवन मिशनच्या योजना सुरु केल्या. अनेक गावात जलजीवन मिशन अंतर्गत मोठा निधी आणून नळपाणी पुरवठा योजना राबवल्या.
यातच रविवारी उद्घाटन झालेल्या गहुंजे पाणीपुरवठा योजनेसाठीचा प्रस्ताव आणि त्याला मान्यता मिळावी यासाठी आमदार शेळकेंनी पाठपुरावा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रविवारी झालेल्या भुमीपुजन सोहळ्यावरुन राष्ट्रवादीकडून आणि आमदार समर्थकांकडून भाजपाला आणि बाळा भेगडे यांना टार्गेट केले जात आहे. ( Ex MLA Maval Minister of State Bala Bhegde Gahunje Tap Water Supply Scheme Bhumi Pujan Ceremony )
अधिक वाचा –
मावळ तालुक्यात पसरतोय हा भयंकर आजार, शेतकरी प्रचंड चिंतेत, उर्से गावात कहर
ई-पीक पाहणी नोंदणीस शेतकऱ्यांचा निरुत्साह, मुळशीत स्वतः तहसीलदार पोहोचले बांधावर