मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. आकुर्डी, तळेगाव दाभाडे या स्टेशनच्या विस्तारानंतर आता अमृत भारत रेल्वे स्टेशन योजना दोन अंतर्गत चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरणाचे काम होणार आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 26) ऑनलाइन माध्यमातून झाले. तसेच शेलारवाडी, जांभूळ, कामशेत या ठिकाणी बांधलेल्या अंडरपास पुलाचे उद्धाटन आणि पोल क्र. 47 मळवली स्टेशन जवळ अंडरपासच्या कामाचे भूमिपूजनही झाले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हेही ऑनलाइन सहभागी झाले होते. तर खासदार श्रीरंग बारणे हे चिंचवड, देहूरोड रेल्वे स्टेशन येथे उपस्थित होते. देशातील रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. रेल्वे स्टेशनचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने अमृत भारत स्टेशन ही योजना हाती घेतली आहे. या योजनेत मावळ मधील रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यासाठी खासदार बारणे यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. रेल्वे स्टेशनचे विस्तारीकरण, सुशोभीकरण व्हावे, प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी खासदार बारणे हे गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. त्यांच्या पाठपुराव्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव दाभाडे या चार स्टेशनचा योजनेत समावेश झाला होता. त्यातील पहिल्या टप्प्यातील आकुर्डी आणि तळेगाव दाभाडे या स्टेशनच्या विस्तारीकरण, सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
आता अमृत भारत योजना दोन अंतर्गत चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्टेशन नूतनीकरण व सुधारचे काम हाती घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन कामाचे भूमीपूजन झाले. तसेच शेलारवाडी, जांभूळ व कामशेत या ठिकाणी बांधलेल्या अंडरपास पुलाचे उद्धाटन व पोल क्र. 47 मळवली स्टेशन जवळ अंडरपास या कामाचे भूमिपूजन देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. ( Expansion of Chinchwad Dehu Road Lonavla Railway Stations Under Amrit Bharat Railway Station Yojana )
विस्तारीकरणात काय होणार –
रेल्वे स्थानकावर फुटओव्हर ब्रीज, प्रतीक्षा रुम, स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्था, सिग्नल, दिव्यांगासाठी सोयी-सुविधा, पर्यावरणपूरक वातारण, आवश्यकतेनुसार लिफ्ट, मोफत वाय-फाय, साफसफाई, अत्याधुनिक सूचना प्रणाली, वाहनतळासाठी जागा, शेड उपलब्ध करुन दिले जाणार असून रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार आहे.
अधिक वाचा –
– कशाळ येथील साकव पुलाचे ग्रामस्थांच्या हस्ते भूमिपूजन; 42 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार शेळकेंचे मानले आभार
– मावळ तालुक्यात राष्ट्रवादी अजितदादा गटाला मोठा झटका! जुन्या जाणत्या नेत्याचा पक्षाला राम-राम… अनेक गंभीर आरोप
– मावळ खरेदी-विक्री संघावर महायुतीची एकहाती सत्ता! ‘या’ 3 उमेदवारांचा धक्कादायक पराभव, एका क्लिकवर वाचा संपूर्ण निकाल